Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या गेटला कुलप कोणाचे ?

शहरात चर्चा रंगली

इस्लामपूर / प्रतिनिधी :  शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या गेटला कुलूप लावण्यात आले आहे.   हे कुलूप राष्ट्रवादी काँग्रेसने की काँग्र

प्रवेशादरम्यान शैक्षणिक शुल्कासंदर्भात तक्रार आल्यास कारवाई : मोहन गायकवाड
सई ताम्हणकरच्या ड्रायव्हारला बेदम मारहाण
वारीतील टेके पाटील ट्रस्टचे सामाजिक कार्य दिशादर्शक

इस्लामपूर / प्रतिनिधी :  शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या गेटला कुलूप लावण्यात आले आहे.   हे कुलूप राष्ट्रवादी काँग्रेसने की काँग्रेसने लावले आहे याची चर्चा शहरात दिवसभर सुरू होती.
          इस्लामपुरातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत ओबीसी मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यात राष्ट्रवादी कार्यालयाची जागा ही काँग्रेसची असल्याबाबात सांगण्यात आले. यानंतर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील, विजय पवार, शाकीर तांबोळी यांनी कागदपत्रांसह पत्रकार परिषद घेवून  ही जागा काँग्रेस कमिटीच्या नावावर असल्याचे पुरावे सादर केले. राष्ट्रवादी कडे नैतिकता असेल तर काँगे्रस कार्यालय रिकामे करावे असे सांगितले होते. दरम्यान सोमवार दि. १६ मे रोजी राष्ट्रवादी कार्यालयाच्या गेटला कुलूप असल्याचे दिसून आले. यामुळे कार्यालयाच्या जागेवरून राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये जुंपणार असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या आवारात वाहनांची वर्दळ जास्त असते. यामुळे ही वाहने कार्यालयाच्या रिकाम्या जागेत लागत असल्यामुळे हे गेट बंद करण्यात आले आहे. कोणीही कार्यालयाच्या गेटला कुलूप लावलेले नाही. यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

COMMENTS