Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोकुंदा स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटवण्याचा वंचित बहुजन आघाडीचा इशारा

किनवट प्रतिनिधी - गोकुंदा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील शेत गट क्र. 116 मधिल 5 गुंटे जमीन ही मसणवटासाठी आरक्षित असतानाही काही भूखंड माफियानी ग्रामपं

 केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर
मुस्लिम समाज इफ्तार पार्टी, खजूरपुरता मर्यादित नाही !
वीज वितरण विभागाच्या विद्युत पोलांवरील सी चॅनल चोरी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
अतिक्रमण हटविण्यासाठी वंचित बहुजन महिला आघाडीचा रास्ता रोको - Marathi News  | Block the path of Vanchit Bahujan Mahila Aghadi to remove encroachment |  Latest dharashiv News at Lokmat.com

किनवट प्रतिनिधी – गोकुंदा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील शेत गट क्र. 116 मधिल 5 गुंटे जमीन ही मसणवटासाठी आरक्षित असतानाही काही भूखंड माफियानी ग्रामपंचायतला हाताशी धरून या आरक्षित जागेवर बेकादेशीर ताबा करून बांधकाम केले आहे.या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीने रीतसर निवेदने करून जागा खुली करण्याची मागणी केली. मात्र त्याची अद्याप दखल घेतली नाही. ही जागा 8 दिवसात खुली झाली नाही. तर लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करण्याचा ईशारा वंचितचे राजेंद्र शेळके यांनी दिला आहे.
गोकुंदा ग्रा. प. कार्यक्षेत्रातील शेत सर्वे क्र 116 मधील 5 गुंठे क्षेत्र हे  मागील सुमारे सत्तर वर्षापासून मसनवटा/स्मशानभूमी म्हणून आरक्षित आहे.परंतु 2018 सालापासून गोकुंदा ग्रा. प. व भूखंड माफियानी संगणमत करून मसनवट्याची जागा बळकावण्याचा प्रयत्न चालविला आहे .गोकुंदा ग्रामपंचायतचे तत्कालीन सरपंच ग्रामसेवक व सदस्यांनी आरक्षित जागेपैकी काही जागा बनावट कागदपत्राद्वारे विक्री करून त्या ठिकाणी इमारत बांधकामास परवानगी दिली आहे. काही भूखंड माफियानी तर  रातोरात शेत गट क्र.114 व 115 कवेलू कारखाना खरेदी केल्यानंतर मोजणी करतांना या मोजणीत  मसनवटासाठीची जागा गायब केली व त्यानंतर  दडपशाही करुन दलीत स्मशानभूमीवर अवैध कब्जा केला आहे.5 गुंठे जागेपैकी काही जागेवर इमारतीचे बांधकाम करण्यात आले असून या बांधकामाला ग्रामपंचायतीने परवानगी दिलीच कशी ?,असा प्रश्न  शेळके यांनी उपस्थित केला आहे. गोकुंदा ग्रामपंचायतचे तत्कालीन सरपंच पदाधिकारी, ग्रामविकास अधिकारी व भूखंड माफिया यांनी संगनमत करुन संघटीतरित्या बनावट दस्त तयार करून मसनवटाची आरक्षित 5 गुंठे  जमीन बळकावल्याचा आरोप करत ही जागा अतिक्रमण मुक्त न झाल्यास  लोकशाही मार्गाने बेमुदत धरणेआंदोलन करण्याचा ईशारा वंचितबहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र शेळके यांनी दिला आहे.

COMMENTS