Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धनंजय मुंडे यांचे इतर मुलींसोबतही संबंध

करुणा मुंडेंचा गंभीर आरोप ; गुन्हा दाखल करण्याची केली मागणी

मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करुणा मुंडे यांनी गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्य

होमगार्ड जवानांना 180 दिवस काम देणार्‍या निर्णयाची अंमलबजावणी करा
कोरोनाचे नवे 15 रुग्ण आढळल्याने अकोले हादरले
वादग्रस्त घोषणा दिल्याने दोन गटांविरूद्ध गुन्हा दाखल

मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करुणा मुंडे यांनी गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात केले असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. धनंजय मुंडे यांचे किती मुलींसोबत संबंध आहे, याचा पर्दाफाश करणार असल्याचा इशारा करुणा मुंडे यांनी दिला आहे.
2 दिवसांपूर्वी देखील करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. मला बीडमध्ये निवडणुकीत हरवून दाखवा, असे आव्हान करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना दिले होते. त्याचप्रमाणे आपल्या किंवा मुलांच्या जीवाचे काही बरे-वाईट झाल्यास धनंजय मुंडे जबाबदार असतील असेही करुणा मुंडे यांनी म्हटले आहे. त्यानंतर आता त्यांनी आणखी खळबळजनक आरोप केले आहेत. धनंजय मुंडेने आजपर्यंत मला फसवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पोलिसांच्या समोर गाडीत रिवॉल्वर ठेवले. माझ्या मुलांना सहा महिने दूर ठेवले. माझ्यावरती जीवघेणे हल्ले झाले. सहा खोट्या केसेस केल्या. षड़यंत्र रचण्यासाठी वेगवेगळे लोक पाठवून माझी आर्थिक फसवणूक केली. तरीपण मी हारली नाही. आणि त्यांच्यासोबत लढत आहे. आता एक नवीन षड्यंत्र चालू केले आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटल्यानंतर माझे खोटे बनावटी व्हिडीओ व्हायरल केले आणि आता रोज-रोज मला धमक्या, मानसिक त्रास देत आहे, तरी मी माझ्या स्वखर्चाने धनंजय मुंडेची आणि माझी नार्को टेस्ट पब्लिकसमोर करण्याची विनंती करत आहे. धनंजय मुंडेचे किती आणि माझे किती खरे आहे ते दूध-का दूध आणि पाणी का पाणी होईल. आणि मी ज्या-ज्या मुलींची नावे सांगेन त्या मुलींसोबत धनंजय मुंडेंचे काय संबंध आहेत त्याचा पण पर्दाफाश होईल आणि या सगळ्या गोष्टींची तक्रार डीजीपी, सीएम आणि महिला आयोगाकडे आहेत. परंतु आतापर्यंत त्यावर एकही कार्यवाही झाली नाही. रुपाली चाकणकरने आतापर्यंत धनंजय मुंडेंवरती कार्यवाही केली नाही. त्यामुळे मी राष्ट्रीय महिला आयोग दिल्लीकडे रुपाली चाकणकरला पदावरून हटवण्याची मागणी करून आली आहे. माझी मुख्यमंत्र्यांना ही विनंती आहे की धनंजय मुंडेंवरती गुन्हा दाखल व्हावा आणि रुपाली चाकणकरला पदावरून काढून सक्षम महिला आयोग अध्यक्ष बनवावे अन्यथा मी आमरण उपोषणासाठी मंत्रालयासमोर बसणार आहे.

COMMENTS