Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहात्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने मदतीची मागणी

शिर्डी/प्रतिनिधी ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राहाता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुपारी 1 वाजता संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठलराव

पैशाचे आमिष दाखवून वृद्धाचे 91 हजाराचे दागिने पळवले
कोपरगाव तालुक्यातील वृद्ध दाम्पत्याचा हत्या करणारे तीन आरोपी जेरबंद
देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा उत्साहात

शिर्डी/प्रतिनिधी ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राहाता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुपारी 1 वाजता संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांच्या नेतृत्त्वाखाली संतप्त शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने मदत मिळावी व महावितरणने शेतकर्‍यांची सुरु केलेली शेती पंपांची विज तोडणी बंद करावी, अशा विविध मागण्यांसाठी रस्तारोको आंदोलन केले.

यावेळी संघटनेचे राज्य कार्यकारी अध्यक्ष अंबादास कोरडे, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठलराव शेळके, तालुकाध्यक्ष शंकरराव लहारे, जनार्दन घोगरे, ज्ञानेश्‍वर सोडणार, अशोक पठारे, राजेंद्र गोर्डे, मिनीनाथ पाचरणे, दिलीपराव आहेर, मच्छिंद्र ऐलम, रुपेंद्र काले, दत्तात्रय लहारे, मारुती डांगे, बबन बाबरे, पुंजाराम आहेर, दत्तात्रय यादव आदी कार्यकर्ते, पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. यावेळी संघटनेच्यावतीने राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी बोलतांना विठ्ठलराव शेळके म्हणाले की चार महिन्यापुर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकरी उध्वस्थ झाला आहे आमच्या मतदारसंघाचे आमदार महसुलमंत्री असल्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने मदत मिळेल अशी आमची आशा होती. परंतु शेतकर्‍यांना अद्यापपर्यंत कुठलीही मदत मिळालेली नाही. सध्या राज्यात शेतमालाला भाव मिळत नसुन कांदा पाच रुपये किलो दराने विकला जात आहे. सरकारने कांद्याला 2 हजार 500 रुपये किमान हमीभाव देवुन कांदा खरेदी करावा. अतिवृष्टीमुळे ऊसाच्या उत्पन्नात 50 टक्के घट झाली असुन ऊसाला 500 रुपये प्रतिटन अनुदान देण्यात यावे.  तसेच सध्या महावितरण कडून शेतकर्‍यांच्या शेतीपंपाची वीज तोडणी सुरू असल्याने  शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान होत आहे शेतकर्‍यांच्या शेतीपंपाची वीज तोडू नये असा न्यायालयाचा आदेश असताना देखील महावितरण कडूनही कारवाई सुरू आहे शेतकर्‍यांच्या शेती पंपाची विज तोडणार्‍या महावितरणच्या अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली तसेच पिकवीमा व अतिवृष्टीची मदत आठ दिवसांच्या आत शेतकर्‍यांच्या खात्यात जमा न झाल्यास शेतकरी आपल्या जनावरे व मुला-बाळांसह रस्त्यावर उतरुन तिव्र स्वरुपाचे आंदोलन करतील, असा इशारा शेळके यांनी दिला.

COMMENTS