Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्ह्यात 55 केंद्रात बारावीच्या परीक्षा सुरू 

१६ हजार ४५२ विद्यार्थी देणार परीक्षा

  वर्धा प्रतिनिधी - बोर्डाच्या इयत्ता १२ वीच्या परीक्षा आज दिनांक २१ फेब्रुवारी पासून सुरु झाल्या आहेत. या परीक्षा उत्तम पध्दतीने पार पाडण्यासा

अटकेची कारवाई टाळण्यासाठी पूजा खेडकर पळाली
२०२४ ची कुस्ती देखील मी निकाली काढेल… सेटलमेंट करण्याचा माझा धंदा नाही…
हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

  वर्धा प्रतिनिधी – बोर्डाच्या इयत्ता १२ वीच्या परीक्षा आज दिनांक २१ फेब्रुवारी पासून सुरु झाल्या आहेत. या परीक्षा उत्तम पध्दतीने पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनासह शिक्षण विभागाने चांगली तयारी केली आहे. बारावीचे ५५ केंद्रांवरून परीक्षा घेतली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत इयत्ता १२ वीची परीक्षा दि.२१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. इयत्ता बारावीचे १६ हजार ४५२ विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. परीक्षा कालावधीत केंद्रावर होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी कॅापीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. कॅापीमुक्त अभियानांतर्गत परीक्षा केंद्राच्या ५० मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही. तसेच या परिसरातील सर्व झेरॅाक्स केंद्र बंद ठेवण्यात आले आहे. केंद्र परिसरात कलम १४४ लागू करण्यात आला आहे. केंद्रावर विद्यार्थ्यांची पोलीस पाटील, कोतवाल, शाळेचे कर्मचारी यांच्याद्वारे तर अंगणवाडी सेविका, मदतनीस, शाळेच्या महिला कर्मचाऱ्यांद्वारे मुलींची तपासणी केली जाणार आहे.

परिक्षेतील गैरप्रकार थांबविण्यासाठी भरारी पथके, बैठे पथके तसेच महसुल, पोलिस व जिल्हा प्रशासनाचे संयुक्त वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहे. कॅापीमुक्त अभियान राबविण्यात ही पथके काम करणार आहे.

COMMENTS