Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे निधन

पुणे/प्रतिनिधी ः भाजपच्या आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे दीर्घ आजाराने गुरूवारी निधन झाले. मागील काही महिन्यापासून सुरु

जिया खान आत्महत्या प्रकरणात सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता
आंतरराष्ट्रीय मल्ल घडविण्याचा प्रयत्न : आ. जयंत पाटील
बोगस कांदा अनुदान प्रकरणी सोळा जणांवर गुन्हा दाखल

पुणे/प्रतिनिधी ः भाजपच्या आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे दीर्घ आजाराने गुरूवारी निधन झाले. मागील काही महिन्यापासून सुरु असलेली कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली. वयाच्या 59 व्या वर्षी पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमधे अखेरचा श्‍वास घेतला. 2019 मध्ये पुण्यातील कसबा मतदार संघातून त्या निवडून आल्या होत्या. त्याआधी अडीच वर्ष त्या पुण्याच्या महापौर होत्या. सलग चारवेळा पुणे महापालिकेच्या नगरसेविका म्हणून त्यांनी काम केले. लोकमान्य टिळकांच्या पणती सुन म्हणून राजकारणात प्रवेश केला होता. मात्र आमदार झाल्यावर त्यांना लगेच कर्करोगाने ग्रासले होते. राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणूकीत अत्यवस्थ असतानाही अ‍ॅम्ब्युलन्समधून जाऊन मतदान केले होते. प्रकृती ठिक नसताना आमदारांनी पुण्याहून मुंबईला येऊन विधानपरिषदेसाठी मतदान केले होते. त्यावेळी त्यांची महाराष्ट्रभर चर्चा झाली होती. भाजपच्या फायटर आमदार म्हणून त्यांचे कौतुक करण्यात आले होते

COMMENTS