Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘कोकण क्षेत्र विकास व नियोजन प्राधिकरण’ स्थापन करणार  

कोकणच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

रत्नागिरी/प्रतिनिधी - कोकणाा सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध असून, कोकणातील सर्व जिल्ह्याच्या विकासासाठी  मुंबई महानगर विकास प्राधीकरणाच्या धर्तीवर

ठाकरे गटाला पुन्हा धक्का
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रुजविलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्त्वे सर्वव्यापी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी 
 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल बुधवारी सपत्नीक श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले.

रत्नागिरी/प्रतिनिधी – कोकणाा सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध असून, कोकणातील सर्व जिल्ह्याच्या विकासासाठी  मुंबई महानगर विकास प्राधीकरणाच्या धर्तीवर ‘कोकण क्षेत्र विकास व नियोजन प्राधिकरण’ स्थापन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी शुक्रवारी रत्नागिरीमध्ये केली. रत्नागिरी जिल्ह्याच्या विकास कामांचा आढावा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते. कोकणातील जिल्ह्यांचा विकासाचा बॅकलॉग मोठ्या प्रमाणावर राहिला असून तो भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन व विकास करण्याचे काम हे प्राधिकरण करेल, असे ते म्हणाले.


बैठकीस उद्योग मंत्री उदय सामंत, बंदरे विकास मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कृषी मंत्री अब्दुल सत्तार तसेच आजी माजी लोकप्रितिनिधींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मत्स्य व्यवसाय धोरणाबाबत प्रयत्न केले जातील. मत्स्य व्यवसायातून परकीय चलन कसे उपलब्ध होईल यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. तामिळनाडू आणि गुजरातच्या मत्स्य व्यवसाय धोरणाचा अभ्यास करून त्याप्रमाणे निर्णय घेण्यात येईल.कोकण विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले जातील. राज्यातील गड किल्ल्यांबरोबरच कोकण विभागातील गड किल्ल्यांबाबत निर्णय घेतले जातील. केरळ प्रमाणे बॅक वॉटर पर्यटनवाढीसाठी बांधा आणि वापरा तत्वावर विविध सेवा सुविधा पुरवल्या जातील.  कोकणातील साकव, विम्यातील त्रुटी, समुद्र किनार्‍यांच्या विकासासाठी प्रयत्न, सिंचनाच्या सुविधा याबाबत प्रयत्न केले जातील. औरंगाबाद पुणे मार्गाच्या धरतीवर मुंबई ते सिंधुदुर्ग हा एक्सेस कंट्रोल मार्ग करता येईल का? याबाबतही अभ्यास करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री बैठकीत म्हणाले.जिल्हा परिषदेतील पाचवी ते सातवीच्या मुलांसाठी ‘गगनभरारी’ ही योजना सुरू करण्यात आली असून यातून निवडण्यात आलेल्या मुलांना ‘नासा’ प्रशिक्षणासाठी पाठवण्याची योजना असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या सादरीकरण करताना सांगितले.  गोळप येथे एक मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा निर्मितीचा प्रकल्पही उभारण्याची योजना असल्याचे ते यावेळी म्हणाले.

COMMENTS