Homeताज्या बातम्यादेश

माजी केंद्रीय मंत्री चिन्मयानंद फरार घोषित

बलात्काराच्या प्रकरणात अजामीनपात्र वॉरंटनंतरही कोर्टात गैरहजर

नवी दिल्ली ः शाहजहानपूरमधील 11 वर्ष जुन्या बलात्कार प्रकरणात न्यायालयाने माजी केंद्रीय मंत्री राज्यमंत्री स्वामी चिन्मयानंद यांच्याविरोधात अजा

कल्याणच्या आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडला पुन्हा भीषण आग l LOKNews24
महामार्गावरील पुलाच्या खड्ड्यात पुन्हा अपघात
जरंडेश्‍वरला भुयारी मार्गात दगडगोटे

नवी दिल्ली ः शाहजहानपूरमधील 11 वर्ष जुन्या बलात्कार प्रकरणात न्यायालयाने माजी केंद्रीय मंत्री राज्यमंत्री स्वामी चिन्मयानंद यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी झाला आहे. न्यायालयापुढे हजर न झाल्यामुळे कोर्टाने त्यांना फरार घोषित केले आहे. कोर्टाने चिन्मयानंद यांच्या घराबाहेर वा सार्वजनिक ठिकाणी नोटीस डकवण्याचे आदेश दिले आहेत.
अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्यानंतरही चिन्मयानंद कोर्टात हजर झाले नाही. या प्रकरणी त्यांच्या वकिलांनी ते आजारी असल्याचा युक्तिवाद केला. पण बचाव फिर्यादी पक्षाने त्यावर हरकत नोंदवली. त्यानंतर कोर्टाने चिन्मयानंदच्या वकिलांचा युक्तिवाद फेटाळला. माजी केंद्रीय राज्यमंत्री स्वामी चिन्मयानंद यांच्यावर 11 वर्षांपूर्वी त्यांच्या शिष्येने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी अपर मुख्य न्यायदंडाधिकारी तृतीय एमपी-एमएलए कोर्ट असमा सुल्ताना यांनी चिन्मयानंद यांच्याविरोदात 30 नोव्हेंबर रोजी अजामीनपात्र वॉरंट जारी केला होता. पण चिन्मयानंद कोर्टापुढे हजर झाले नाही. त्यानतंर कोर्टाने त्यांना फरार घोषित करत कलम 82 अंतर्गत कारवाई करणे व आदेशाची प्रत चिन्मयानंद यांच्या घराबाहेर व एखाद्या सार्वजनिक ठिकाणी डकवण्याचे आदेश दिले.

COMMENTS