नवी दिल्ली : ’टेरर फंडिंग’ हा दहशतवादापेक्षाही मोठा धोका आहे.परंतु, याचा संबंध कोणत्याही धर्माशी, राष्ट्रीयत्वाशी किंवा गटाशी जोडला जाऊ नये, असे
नवी दिल्ली : ’टेरर फंडिंग’ हा दहशतवादापेक्षाही मोठा धोका आहे.परंतु, याचा संबंध कोणत्याही धर्माशी, राष्ट्रीयत्वाशी किंवा गटाशी जोडला जाऊ नये, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा(Amit Shah) यांनी शुक्रवारी व्यक्त केले. नवी दिल्ली येथे दहशतवादविरोधी वित्तपुरवठ्यावरील ’नो मनी फॉर टेरर’ या विषयावरील तिसर्या मंत्रीस्तरीय परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते.
यावेळी गृहमंत्री शहा म्हणाले की, दहशतवाद्यांना संरक्षण देणे म्हणजे दहशतवादाला प्रोत्साहन देणे होय. अतिरेकी घटक आणि दहशतवादाला पाठबळ देणार्या देशांना रोखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. दहशतवादी सतत हिंसा करण्यासाठी, तरुणांना कट्टरतावादी बनवण्यासाठी आणि आर्थिक संसाधने वाढविण्यासाठी प्रयत्न करतात. तसेच सायबर गुन्हेगारीच्या साधनांचा वापर करून आणि आपली ओळख लपवून कट्टरतावाद पसरविण्याचे काम करतात. दहशतवाद हा जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी सर्वात मोठा धोका आहे. परंतु माझा असा विश्वास आहे की दहशतवादाला वित्तपुरवठा करणे दहशतवादापेक्षा अधिक धोकादायक आहे कारण अशा प्रकारच्या वित्तपुरवठ्यामुळे दहशतवादाला पाठबळ मिळते. शिवाय दहशतवादाला अर्थपुरवठा केल्याने जगातील देशांची अर्थव्यवस्था कमकुवत असल्याचे शाह यांनी सांगितले
COMMENTS