राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना अटक होणार ?

Homeताज्या बातम्या

राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना अटक होणार ?

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांचा दावा.

दिल्ली प्रतिनिधी- नॅशनल हेराल्ड(National Herald) आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात दिवसेंदिवस गांधी माता - पुत्राला धक्केच मिळत आहेत. काल  ED ने हेराल्ड हाऊ

..ही तर मोदी सरकारच्या अपयशाची कबुली : खा. राहुल गांधी
राहुल गांधींना दिलासा नाहीच
काँग्रेसचे ’हाथ से हाथ जोडो’ अभियान

दिल्ली प्रतिनिधी- नॅशनल हेराल्ड(National Herald) आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात दिवसेंदिवस गांधी माता – पुत्राला धक्केच मिळत आहेत. काल  ED ने हेराल्ड हाऊस इमारतीतील यंग इंडियन कार्यालयाला टाळे ठोकले. शिवाय परवानगीशिवाय हे कार्यालय खोलू नये असे स्पष्ट निर्देश EDने दिले आहेत. आधी या प्रकरणात ईडीकडून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी(Sonia Gandhi) तसेच खासदार राहुल गांधी(Rahul Gandhi) यांची चौकशी करण्यात आली होती. यावरच आता भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी(Subramaniam Swamy) यांनी सोनिया गांधी आणि खासदार राहूल गांधी यांना अटक होणार असल्याचा दावा केला आहे. या सर्व पार्श्वभुमीवर कॉंग्रेस कार्यालय, सोनिया गांधी यांचं निवासस्थान तसेच राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

COMMENTS