Homeताज्या बातम्यादेश

राहुल गांधींना दिलासा नाहीच

याचिका स्वीकारण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः काँगे्रस नेते राहुल गांधी यांना सूरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना खासदार

पंतप्रधान मोदींसाठी मणिपूर भारत नाही का ?
भाजपने आदिवासींना वनवासी केले – राहुल गांधी
राहुल गांधींनी अटलजींच्या स्मृतीस्थळाला केले अभिवादन

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः काँगे्रस नेते राहुल गांधी यांना सूरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले. याविरोधात त्यांनी सूरत न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली, ती देखील न्यायालयाने फेटाळून लावली. याविरोधात त्यांनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयाने निकाल राखून ठेवत निर्णय जूनमध्ये सुनावणार असल्याचे सांगितले. त्यानंतर राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र येथेही त्यांना दिलासा मिळालेला नाही.
सर्वोच्च न्यायालयाने अपात्रतेवर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिल्यामुळे राहुल गांधी यांच्यासमोरील अडचणी वाढतांना दिसून येत आहे. लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 8(3) च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी याचिका राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र ही याचिका स्वीकारण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मानहानी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अंतरिम दिलासा देण्यास गुजरात उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला होता. या प्रकरणी सूरत सत्र न्यायालयाच्या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. न्यायमूर्ती हेमंत प्रचाक सुट्टीनंतर या प्रकरणी निकाल देणार आहेत.

COMMENTS