HomeUncategorized

त्रिपुडी येथील सोन्या नावाच्या चंद्रकोर बोकडाला 23 लाखाची बोली

पाटण / प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील त्रिपुडी येथील आबासो रामचंद्र देसाई यांचा सोन्या नावाचा बोकड सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. हा बोकड दीड वर्षाचा

हनुमान चालीसासह भोंग्यांची भाषेमुळे समाजात तेढ निर्माण : ना. जयंत पाटील
पावसाळ्यात वीजयंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरणचे आवाहन
दि. बा. पाटील यांची साहित्य अकादमीच्या चर्चा सत्र अध्यक्षपदी निवड

पाटण / प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील त्रिपुडी येथील आबासो रामचंद्र देसाई यांचा सोन्या नावाचा बोकड सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. हा बोकड दीड वर्षाचा असून या बोकडाचे वजन तब्बल 65 किलोच्या आसपास आहे. या बोकडाला चक्क 23 लाखाची मागणी होत आहे. या बोकडाच्या डोक्यावर जन्मताच अर्धचंद्रकोरची खून आहे. त्यामुळे मुस्लिम समाजात बकरी ईदला अशा बोकडाच्या कुरबानीला फार महत्व आहे. मुबंई पुणेसह अनेक ठिकाणाहून मुस्लिम बांधवांकडून आतापर्यंत या सोन्या नावाच्या बोकडाला 18 लाख 50 हजारापर्यंत मागणी केली आहे. त्यामुळे या बोकडाची किंमत नक्कीच आणखी वाढणार आहे, हे नक्की.

COMMENTS