मुंबई : मुंबईतील वाढत्या बलात्काराच्या घटनांमुळे पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आला आहे. मुंबईतील गोवंडी येथील शिवाजीनगरमध्ये एक धक्क
मुंबई : मुंबईतील वाढत्या बलात्काराच्या घटनांमुळे पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आला आहे. मुंबईतील गोवंडी येथील शिवाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. चार युवकांनी मिळून एका 20 वर्षीय युवतीवर बलात्कार केल्यामुळे मुंबई पुन्हा एकदा हादरली आहे.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून दोन जणांना अटकसुद्धा केलं आहे. काही महिन्यांपूर्वी डोंबिवली येथे एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता गोवंडी येथे वीस वर्षीय युवतीवर अत्याचार झाल्याचे समोर आल्यानंतर रोष व्यक्त केला जातोय. तसेच या प्रकरणाशी संबंधित असणार्या बाकीच्या दोन आरोपींनाही तत्काळ अटक करुन कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित वीस वर्षीय युवती एका हॉलमध्ये केटरिंगचे काम करते. सकाळी काम आटोपून युवती आपल्या घरी जात होती. यावेळी ओळखीच्या एका युवकाने तिला इतक्या उशिरा कुठे गेली होती असं विचारलं आणि तुझ्याशी काही बोलायचे असं म्हणून एका निर्मणुष्य झोपडीत नेले. त्याच वेळी त्याचे 3 साथीदारही त्या ठिकाणी आले. या तिघांनी नंतर आळीपाळीने युवतीवर बलात्कार केला. त्यानंतर आरोपी तिथून निघून गेले. आरोपी गेल्यानंतर या युवतीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून आपबीती सांगितली. ही माहिती समजताच पोलीस दलातील निर्भया पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच पीडितेला पोलीस ठाण्यात आणून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. या संदर्भात पोलिसांनी 10 पथकं तयार करून आरोपीचा शोध घेणे सुरू केले आहे. आतापर्यंत यातील दोन आरोपी उत्तर प्रदेश येथील वस्ती जिल्ह्यात आपल्या गावी निघून जाण्याच्या तयारीत होते. पण पोलिसांनी या दोन्ही आरोपीना डोंगरी येथून अटक केले. तर बाकीच्या दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी हे अल्पवयीन आहेत. तर फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाने यांनी दिली.
COMMENTS