मुंबई महापालिका करणार 43 टन ऑक्सिजनचे उत्पादन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई महापालिका करणार 43 टन ऑक्सिजनचे उत्पादन

ऑक्सिजनची मागणी वाढत असल्याने महापालिकेने आता स्वतः ऑक्सिजन निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे.

रशियाची युद्ध थांबवण्यासाठी चर्चेची तयारी
महिला विनयभंग प्रकरण भाजपच्या फरार नगरसेवकाला अटक | LOKNews24
सहकार धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी समितीची घोषणा

मुंबई/प्रतिनिधीः ऑक्सिजनची मागणी वाढत असल्याने महापालिकेने आता स्वतः ऑक्सिजन निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार 12 रुग्णालयांमध्ये एकूण 16 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प येत्या महिन्याभरात उभारण्यात येणार आहेत. हवेतील ऑक्सिजन निर्माण करून दररोज एकूण 43 टन ऑक्सिजन साठा तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईतील कोविड रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे

 बाधित रुग्णांच्या फुफ्फुसांना होणारा संसर्ग अधिक असल्याने अधिक क्षमतेने (लीटर प्रति मिनीट) ऑक्सिजन रुग्णांना पुरवावा लागतो; मात्र ऑक्सिजन उत्पादक आणि वाहतूकदारांच्या क्षमता आणि ऑक्सिजन उत्पादन, पुरवठा व वाहतूक क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या मर्यादा असल्याने मागणी व पुरवठा यांचा मेळ घालताना राज्य सरकार व महापालिका प्रशासन यांची कसरत होत आहे. याचा फटका मुंबईलाही बसत असल्याने गेल्या काही दिवसांमध्ये खासगी आणि महापालिका रुग्णालयांमधील ऑक्सिजन संपल्यावर रुग्णांना अन्य रुग्णालयात स्थलांतरीत करावे लागत आहे. त्यामुळे महापालिका आणि वैद्यकीय यंत्रणेवर ताण वाढत असल्याने पालिकेच्या रुग्णालयांमध्ये स्वतःचे प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी घेतला आहे. हे प्रकल्प किमान 15 वर्षे ते कमाल 30 वर्षे चालू शकतात. एकूण खर्च अंदाजे 90 कोटी रुपये इतका अपेक्षित आहे. या संयंत्रातून निर्माण होणार्‍या ऑक्सिजनचा प्रती घनमीटर दर हा लिक्विड ऑक्सिजन दराइतकाच आहे. जंबो सिलिंडरशी तुलना करता त्याच्या अर्ध्याहूनही कमी आहे. त्यामुळे पालिकेच्या आर्थिक खर्चात बचत होणार आहे. दोन वर्षांपूर्वी कस्तुरबा रुग्णालयात प्रतिदिन सुमारे 500 घनमीटर (क्युबिक मीटर) क्षमतेचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प महापालिकेने उभारला आहे, तर जोगेश्‍वरीतील ट्रॉमा रुग्णालयामध्ये वर्षभरापूर्वी प्रतिदिन एक हजार 740 घनमीटर (क्युबिक मीटर) क्षमतेचा प्रकल्प उभारला आहे. या दोन्ही रुग्णालयांतील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आपत्ती काळात अत्यंत मोलाचे ठरत आहेत. हे दोन्ही प्रकल्प वातावरणातील हवेतून प्राणवायू निर्मिती या तंत्रावर आधारीत आहेत.

COMMENTS