Homeताज्या बातम्यासंपादकीय

भाजपला बोध

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून म्हणजे 15 ऑगस्टपासून 1947 पासून ते 1967 पर्यंत संपूर्ण देशभरात काँगे्रसचा एकछत्री अंमल होता. मात्र 1967 पासून क

काँगे्रसमधील गोंधळ
तपासयंत्रणांचे छापे
कर संकलनात वाढ, मात्र जनतेचे काय ?

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून म्हणजे 15 ऑगस्टपासून 1947 पासून ते 1967 पर्यंत संपूर्ण देशभरात काँगे्रसचा एकछत्री अंमल होता. मात्र 1967 पासून काँगे्रसला घरघर लागली, आणि प्रादेशिक पक्ष पुढे येवू लागले. मात्र 1978 ते 80 चा अपवाद वगळता 90 च्या दशकापर्यंत काँगे्रसने प्रादेशिक पक्षाला सोबत घेवून सत्ता राखली. त्यानंतर 1996 पासून ते 2004 पर्यंत काँगे्रस पुन्हा सत्तेत येवू शकली नाही. त्यानंतर 2004 ते 2014 पर्यंत काँगे्रसने सत्ता राखली. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत मात्र काँगे्रस पन्नाशीच्या आत गेली. कधी नव्हे ती काँगे्रसची इतकी पीछेहाट कधीही झाली नव्हती. याचे प्रमुख कारण म्हणजे सत्ता आपल्याच मिळत जाते, या भ्रमात काँगे्रस राहिली, आणि पक्षात नवे बदल, नवे धोरण अंमलात न आणू शकल्यामुळे काँगे्रसची पीछेहाट झाली. हा इतिहास सांगण्याचा उद्देश म्हणजेच भाजपची नुकतीच झालेली बैठक. या बैठकीत भाजपने घराणेशाहीला चाप लावत, एका घरातून एकालाच उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. जर भाजपने हा बदल केला नसता, तर उद्याही भाजपची अवस्था काँग्रेससारखीच झाली असती. पक्षात वेळोवेळी बदल करावे लागतात, भाकरी फिरवावी लागते, अन्यथा सत्ता टिकत नाही. त्यामुळे पक्षात कुणी नाराज झाले तरी, ती नाराजी ओढवून फेरबदल करावे लागतात. मात्र काँगे्रसमध्ये सरंजामदार तयार होवू लागले होते. या सरंजामदारांनी एक-एक राज्य आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. आपल्याला डावलले तर, राज्यातील सगळेच आमदार घेवून पक्षांतर करण्याचा इतर पक्षात जाण्याच्या धमक्या देत असल्यामुळे, त्यांचे पुनर्वसन पक्षाला नेहमीच करावे लागले. आज महाराष्ट्रातील राजकारणाची परिस्थिती पाहता हाताच्या बोटावर मोजता येईल, इतक्यात नेत्यांच्या घरात आमदारकी, खासदारकी, मंत्रिपदे आहेत. त्यामुळे सत्तेचे केंद्रीकरण होतांना दिसून येत आहे. बाप कॅबिनेट मंत्री तर, मुलगा खासदार, बाप मुख्यमंत्री तर, मुलगा खासदार, बाप राज्यात तर मुलगा केंद्रात, अशी कितीतरी उदाहरणे देता येईल. त्यामुळे महाराष्ट्रात काही घराण्याभोवती सत्ता केंद्रीत झाली आहे. आज वारे भाजपच्या बाजूने असल्यामुळे लगेच पक्षांतर, पुन्हा वारे बदलले की, मूळ काँगे्रसमध्ये परत असे आयाराम-गयारामचा खेळ सध्या सुरू आहे. त्यामुळे कोणताच पक्ष निर्विवादपणे सत्ता मिळवू शकत नाही. त्याला इतर पक्षाची मदत घ्यावीच लागणार आहे. त्याचबरोबर कोणत्याही पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी मतदारसंघाची बांधणी, संघटन, नव्या चेहर्‍यांना संधी द्यावी लागणार आहे, तरच त्या पक्षांचा कस लागणार आहे. आणि भाजपला त्याचा लवकर बोध झाला, हे महत्वाचे आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने काँगे्रसच्या घराणेशाहीवर टीका करतांना दिसून येतात. मात्र ही टीका करतांना त्यांच्याच पक्षात मोठी घराणेशाही वाढतांना दिसून येत आहे. भलेही त्यांच्या मूळ पक्षात घराणेशाही मोठ्या प्रमाणात नसेल, मात्र त्यांच्या पक्षात सध्या पक्षांतर करून येणार्‍या आयारामची संख्या मोठी असून, या आयारामच्या माध्यमातून भाजपमध्ये देखील घराणेशाही जोमाने वाढू पाहत आहे. त्यामुळे भाजपने जर आजच या घराणेशाहीला चाप लावला नाही, तर ही घराणेशाही भाजपला सुद्धा गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाने घराणेशाहीला चाप लावण्याची खरी गरज आहे. कारण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अनेक राजकीय कुटुंबातून राजकीय घराणेशाही वाढतांना दिसून येत आहे. त्यामुळे सत्ता एकाच घराभोवती केंद्रीत राहते, त्यामुळे सत्ता इतर वंचित घटकांपर्यंत पोहचत नाही, हे वास्तव असून, यात कुठेतरी बदल करण्याची गरज आहे. 

COMMENTS