महाराष्ट्रात धुळीच्या वादळाचा धुमाकूळ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्रात धुळीच्या वादळाचा धुमाकूळ

मुंबई, पुण्याला सर्वाधिक फटका ; हवेची गुणवत्ता खालावली

मुंबई/पुणे : पाकिस्तानातून भारतात गुजरात आणि अरबी समुद्रामार्गे धुळीचे वादळ महाराष्ट्रात दाखल झाले आहे. याचा सर्वाधिक फटका मुंबई, पालघर आणि पुणे जिल्

केज-बीड रोडवर मस्साजोग येथे जीप दुचाकीचा भीषण अपघात अपघातात एक ठार तर एक जण गंभीर जखमी
त्या आरोपीला बालन्यायालयापुढेच हजर करा… कर्जतच्या प्रकरणात खंडपीठाने दिला तूर्तातूर्त अटकपूर्व जामीन
डॉ. गणेश चव्हाण पुणे विद्यापीठाच्या भूगोल अभ्यास मंडळावर

मुंबई/पुणे : पाकिस्तानातून भारतात गुजरात आणि अरबी समुद्रामार्गे धुळीचे वादळ महाराष्ट्रात दाखल झाले आहे. याचा सर्वाधिक फटका मुंबई, पालघर आणि पुणे जिल्ह्याला बसला आहे. मुंबईत तर हवेत धुळीचे कण मोठया प्रमाणात बघायला मिळाले आहेत. पुढील बारा तासांत धुळीचे वादळ 20 ते 30 किलोमीटर वेगाने येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
धुळीच्या वार्‍यामुळे काही ठिकाणी दृश्यमानता कमी होण्याचीही शक्यता आहे. हवेतील धुलीकणांचं प्रमाण वाढल्याने मुंबईत लोकल ट्रेन, आणि उंच इमारती काहीशा अंधुक दिसत असल्याचेही फोटो समोर आले आहेत. तसंच मुंबईत रविवारी सकाळपासूनच हवेची गुणवत्ता खालावल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे वरीष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीतर यांनी दिली आहे.
पुणे शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून अंशतः ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. त्यामुळे किमान तापमानात ही वाढ होत आहे. मात्र कमाल तापमानातील घट आणि वार्‍यांच्या प्रवाहामुळे दिवसा गारठा जाणवत होता. रविवारी शहरात 17.2 अंश सेल्सिअस किमान तर 25 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंदले गेले. तसेच धुळीचा वादळाच्या प्रभावामुळे हवेतील धुलीकणांमध्ये ही वाढ झाली होती. राज्यात या पूर्वी 2015 आणि 2012 मध्ये अशा प्रकारचा धुळीचे वादळ आले होते. वाळवंटी परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यास तेथून धूळ उंचावर उडते आणि ही धूळ पश्‍चिमेकडून वाहणार्‍या वार्‍यांमध्ये मिसळते. त्यामुळे वार्‍यांच्या प्रवाहाबरोबर धुळ कित्येक किलोमीटरचा प्रवास करतात आणि धुळीचे वादळ निर्माण होते. साधारणपणे अशी वादळे देशात उत्तरेकडील काही राज्यांपर्यंत प्रवास करतात.
दरम्यान, दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा परिसरात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज सकाळपासूनच याठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली असून वातावरणात थंडगार वारे वाहत आहेत. येत्या काही तासात याठिकाणी हलक्या ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. उद्यापासून राज्यात कोरडे हवामान राहणार असून पुढील चार दिवसांसाठी कोणताही इशारा देण्यात आला नाही. दुसरीकडे, राज्यात गेल्या चोवीस तासात अनेक ठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद झाल्याने किमान तापमानात किंचितशी वाढ झाली आहे. तसेच वातावरणात आर्द्रतेचं प्रमाण देखील वाढले आहे.

‘या’ जिल्ह्यात वाहणार धुळीचे वारे
पाकिस्तानातून महाराष्ट्रात आलेल्या धुळीच्या वादळाने जनजीवन विस्कळीत केले असून, रविवारी अनेक शहरात धुळीचे वारे बघायला मिळाले. वातावरणात गारवा वाढला असून, रविवारी वातावरण दिवसभर ढगाळ होते. हवामान खात्याने मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांना धुळीच्या वार्‍यांचा इशारा दिला आहे. संबंधित जिल्ह्यात पुढील 12 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. येत्या बारा तासांत याठिकाणी धुळीचे वारे वाहणार आहेत. हे वारे 20 ते 30 किमी प्रतितास वेगाने वाहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. परिसरातील नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी, तसेच मास्कचा वापर करावा, असा सल्ला देण्यात आला आहे.

COMMENTS