बीड नगर परिषदेच्या हद्दीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून निश्चित केलेले महत्वकांक्षी विकासकामे, प्रकल्प योग्य नियोजन करुन तात

बीड नगर परिषदेच्या हद्दीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून निश्चित केलेले महत्वकांक्षी विकासकामे, प्रकल्प योग्य नियोजन करुन तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिल्या बीड जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित बीड नगर परिषदेच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी, खासदार बजरंग सोनवणे, आमदार धनंजय मुंडे, आमदार संदीप क्षिरसागर, आमदार विजयसिंह पंडीत, आमदार विक्रम काळे, पालक सचिव डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, पोलीस अधिक्षक नवनीत काँवत उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, दिवंगत अजितदादा पवार यांनी बीड शहराच्या सर्वागिंण विकासाकरीता बीड नगर परिषदेच्या हद्दीत महत्वकांक्षी विकास कामे आणि प्रकल्प निश्चित केले होते. त्या सर्व विकास कामे आणि प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी नगर परिषदेने तातडीने योग्य नियोजन करुन कार्यवाही करावी. शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी जागेचे नियोजन करुन, दैनंदिन घनकचरा संकलन व वाहतूकीसाठी 15 व्या वित्त आयोगातून नियोजन करावे. सदर कामासाठी शासनस्तरावर कोणतीही परवानगी किंवा निधीची आवश्यकता असल्यास त्याबाबत कळवावे. शहरातील विकासकामांना गती देण्याबरोबरच नागरिकांच्या दैनंदिन सुविधांशी संबंधित सुविधा योग्य पणे राबविण्यात याव्यात. तसेच नगर परिषदेत रिक्त असलेल्या राजपत्रित अधिकार्यांच्या पदे भरण्याबाबत तात्काळ निर्णय घेण्यात येईल.

COMMENTS