Homeताज्या बातम्या

परळीत तोहिद खान कुटुंबीयांची वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांच्याकडून सांत्वनपर भेट; एक लाखांची मदत जाहीर

बीड : महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष तथा शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे राज्यप्रमुख समीर गुलाम नबी काझी यांनी शुक्रवार, १२ जून २०२६ रोजी प

लाडकी बहीण योजनेत 71 लाख महिला अपात्र
लाडक्या बहिणींना ई-केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ;30 एप्रिलपर्यंत करता येणार दुरूस्ती : मंत्री अदिती तटकरे
एसटी महामंडळाने प्रवाशांच्या समस्या सोडविण्यावर भर द्यावाउपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ; ‘राजामाता जिजाऊ’ बससेवेचे लोकार्पण

बीड : महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष तथा शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे राज्यप्रमुख समीर गुलाम नबी काझी यांनी शुक्रवार, १२ जून २०२६ रोजी परळी येथे जाऊन मयत तोहिद खान यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. या अत्यंत संवेदनशील भेटीदरम्यान त्यांनी पीडित कुटुंबाला एक लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

समीर काझी यांनी यावेळी तोहिद खान यांच्या हत्येचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवून नराधम आरोपींना कठोरतम शिक्षा देण्याची आग्रही मागणी केली. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी ‘विशेष तपास पथक’ (SIT) गठित करण्याबाबत आगामी मान्सून अधिवेशनात राज्य सरकारकडे मागणी करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची लवकरच वरिष्ठ पातळीवर शिष्टमंडळ भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तोहिद खान यांच्या मुलांच्या शिक्षणाची आणि कुटुंबाच्या भविष्याची जबाबदारी वक्फ बोर्ड सर्वतोपरी उचलणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.

या वेळी शिवसेना बीड जिल्हाप्रमुख सरफराज काझी, ज्येष्ठ समाजसेवक नूर लाला, परळीचे उपनगराध्यक्ष राजा खान पठाण, माजी नगरसेवक शरीफ रोशन, युवा उद्योजक शकील बागवान यांच्यासह परळीतील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS