Homeताज्या बातम्या

बीडच्या विकासासाठी आ.संदीप क्षीरसागर आक्रमकजिल्हा नियोजन बैठकीत केल्या महत्वाच्या मागण्या

बीड विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासकामांना गती देण्यासाठी आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मतदारसंघातील प्रलंबित

शेवगाव: २५० कामगारांची आरोग्य तपासणी संपन्न
एकाच वैद्यकीय अधिकार्‍यावर 50 हजार नागरिकांची जबाबदारीतामसा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवा संकटात
गुरुद्वारा सचखंड बोर्डाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि विकासकामांचे उद्घाटनडॉ. विजय सतबीरसिंघ यांची माहिती



बीड विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासकामांना गती देण्यासाठी आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मतदारसंघातील प्रलंबित आणि महत्त्वाच्या प्रश्नांबाबत आक्रमक भूमिका घेतली.
राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांनी रेल्वे, आरोग्य, शिक्षण, नगर परिषद आणि क्रीडा यांसारख्या विविध क्षेत्रांतील नागरिकांच्या समस्या मांडून ठोस उपाययोजनांची मागणी केली. बीड मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी आणि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करण्यास कटिबद्ध असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. रेल्वे मार्गावरील वाहतूक कोंडी सुटण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी चार भुयारी मार्ग (अंडर टनल) उभारण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी बैठकीत केली.  यासोबतच घुगेवाडी-बरगवाडी-तुपेवाडी-ढोरकवाडी, हिवरसिंगा-करंजवण-मालकाचीवाडी-खडकवाडी आणि रोकडेश्वरनगर ते हिवरसिंगा या राज्य महामार्गांवर तातडीने रेल्वे उड्डाणपूल उभारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. आरोग्य क्षेत्राचा विचार करता, लिंबागणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अत्यंत दुरवस्थेत असलेल्या इमारतीसाठी तातडीने निधी मंजूर करून दुरुस्ती करावी, तसेच चौसाळा येथे मंजूर असलेल्या नवीन ग्रामीण रुग्णालयाचे काम विनाविलंब सुरू करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. शिक्षण क्षेत्राबाबत बोलताना आ. क्षीरसागर यांनी एका महत्त्वाच्या धोरणात्मक मुद्द्याकडे  लक्ष वेधले. ज्या शाळांमध्ये शिक्षकांच्या पुढाकाराने गुणवत्ता निर्माण झाली आहे, तिथे संबंधित शिक्षकाची बदली झाल्यानंतरही ती गुणवत्ता कायम राहील, यासाठी शासनस्तरावरून ठोस धोरण व तरतूद करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. बीड शहरातील नागरी सुविधांचा प्रश्न मांडताना त्यांनी छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे नागरिकांसाठी सिंथेटिक व मातीचा वॉकिंग ट्रॅक तयार करण्याची मागणी केली. तसेच, ’अमृत अटल योजनेच्या’ वीजजोडणीसाठी 15 व्या वित्त आयोगातून तरतूद करून, 10 ते 15 दिवसांऐवजी एक दिवसाआड पाणीपुरवठा करावा आणि विजेचा खर्च वाचवण्यासाठी सोलार योजना राबवावी, असा प्रस्ताव त्यांनी ठेवला. नगरपालिकेच्या करांचे नव्याने पुनर्विलोकन केल्यास उत्पन्न वाढून स्वच्छता कर्मचार्‍यांच्या वेतनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याशिवाय बीड येथील जिल्हा क्रीडा संकुलाला ’छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल’ असे अधिकृत नाव देण्यात यावे, अशी आग्रही मागणी करून बीडच्या विकासासाठी आपण शेवटपर्यंत लढत राहू, असा शब्द आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिला.

COMMENTS