Homeताज्या बातम्या

वाहतूक नियमांचे पालन ही काळाची गरज; विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरिक बनावे- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने नांदेड येथील महात्मा

सौ. के.एस.के. महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
बीड येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरातरुणांनी शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी दैनंदिन जीवनात योगाचा अवलंब करावा – जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजननागरिकांनी योग दिनात सहभागी होऊन आरोग्यदायी जीवनशैलीचा संकल्प करावा- जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन

निबंध :वाहतुकीचे नियम का पाळावे ? - Essay: Why follow traffic rules? |  Webdunia Marathi

रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने नांदेड येथील महात्मा फुले हायस्कूल येथे मंगळवारी (दि. 28) विशेष वाहतूक सुरक्षा जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षित वाहतुकीचे महत्त्व समजावून सांगत, वाहतूक नियमांचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केले.
     कार्यक्रमात सेफ इंडिया रोड्स व अँटीकरप्शन टीम इंडियाचे डायरेक्टर घनश्याम ओझा, वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जासपाल सिंग कोर्टतीर्थवाले, पोलीस उपनिरीक्षक अजय साखळे उपस्थित होते.
    यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी विद्यालयातील विज्ञान विभाग, क्रीडा विभाग आणि अटल टिंकरिंग लॅबमधील नाविन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे विशेष कौतुक केले. शिस्तबद्ध वातावरण, अभ्यासासोबतच विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय सहभाग आणि विद्यार्थ्यांची सर्जनशीलता पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
     कार्यक्रमादरम्यान या शाळेचे सहशिक्षक, मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य आणि साहित्यिक डॉ. राम वाघमारे यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना त्यांच्या स्वलिखित पाच पुस्तकांचा संच भेट देत त्यांचा सन्मान केला. जिल्हाधिकार्‍यांनी या साहित्यकृतींचे कौतुक करत डॉ. वाघमारे यांच्या साहित्यसेवेचे अभिनंदन केले. या कार्यक्रमास उपमुख्याध्यापक डॉ. अण्णा गरड, पर्यवेक्षक एस. व्ही. जाधव, शिक्षकवृंद तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

COMMENTS