Homeताज्या बातम्या

आरआरबी परीक्षार्थ्यांसाठी दिलासा; जालना-रायचूर एक्स्प्रेसला दोन अतिरिक्त डबे

नांदेड : रेल्वे भरती बोर्ड (आरआरबी) परीक्षेसाठी प्रवास करणार्‍या उमेदवारांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने जालना

अरुण कुमार जैन, महाव्यवस्थापक, दक्षिण मध्य रेल्वे यांच्याकडून आदिलाबाद रेल्वे स्थानकाची पाहणी
नांदेड-निजामुद्दीन साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वेच्या 8 फेर्‍यांत वाढ
नांदेड रेल्वे विभागाची अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध विशेष मोहीम47 जणांवर कारवाई, 36,850 दंड वसूल
Jalna - Raichur Express/17664 Travel Forum - Railway Enquiry

नांदेड : रेल्वे भरती बोर्ड (आरआरबी) परीक्षेसाठी प्रवास करणार्‍या उमेदवारांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने जालना-रायचूर-जालना एक्स्प्रेसला दोन अतिरिक्त जनरल सेकंड क्लास (जीएस) डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परीक्षार्थ्यांसह इतर प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे.नांदेड विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 17663 जालना-रायचूर एक्स्प्रेसला 1 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट 2026 या कालावधीत जालना येथून सुटणार्‍या प्रत्येक फेरीत दोन अतिरिक्त डबे जोडण्यात येतील. तसेच गाडी क्रमांक 17664 रायचूर-जालना एक्स्प्रेसला 2 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2026 या कालावधीत रायचूर येथून सुटणार्‍या प्रत्येक फेरीत हे अतिरिक्त डबे उपलब्ध असतील.आरआरबी परीक्षेसाठी राज्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने उमेदवार रेल्वेने प्रवास करत असल्याने होणारी गर्दी कमी करण्यासाठी आणि परीक्षार्थ्यांना सुरक्षित, सोयीस्कर व आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा तात्पुरता निर्णय घेण्यात आला आहे.दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने परीक्षार्थी व इतर प्रवाशांनी या अतिरिक्त सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. हा निर्णय परीक्षेच्या कालावधीत रेल्वे प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

COMMENTS