Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव शहरातील अनाधिकृत अतिक्रमणे जमीनदोस्त

सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाची मोठी कारवाई

कोपरगाव/प्रतिनिधी ः कोपरगाव शहराला जाऊन मिळणारा अतिशय वर्दळीचा रस्ता समजला जाणार्‍या साईबाबा कॉर्नर ते कोपरगाव रेल्वे स्टेशनच्या दुतर्फा असणारी स

नगर अर्बन बँकेची अखेर निवडणूक होणार ; चिन्ह वाटप जाहीर, बँक बचाव पॅनेलचा बिनविरोध सूर बासनात
संजयनगरचा कत्तलखाना आरोग्यास धोकादायक- नगराध्यक्ष वाहडणे
श्री छत्रपती शिवाजी महाराज मानाची दहीहंडी उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर

कोपरगाव/प्रतिनिधी ः कोपरगाव शहराला जाऊन मिळणारा अतिशय वर्दळीचा रस्ता समजला जाणार्‍या साईबाबा कॉर्नर ते कोपरगाव रेल्वे स्टेशनच्या दुतर्फा असणारी सुमारे 130 अनाधिकृत अतिक्रमणे बुधवार 17 मे रोजी भल्या सकाळीच सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कोपरगाव कार्यालयाच्या अतिक्रमण पथकाने जमिनीदोस्त केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
सविस्तर वृत्त असे की, अहमदनगर व छत्रपती संभाजी नगर या दोन जिल्ह्यांना जोडला जाणारा कोपरगाव-वैजापूर राज्यमार्ग 65 वरील रस्त्याच्या दुतर्फा गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात झाली होती यात हातावर मोलमजुरी करणार्‍या नागरिकाची झोपडी वजा पत्रा, प्लास्टिक कागद, बांबू पासून तयार केलेली घरे, औद्योगिक वसाहती लगत असलेल्या व्यावसायिकांनी आपल्या गाळ्यासमोर अनाधिकृत रित्या टाकलेले पत्र्याचे शेड, जिनिंग प्रेसिंग च्या भिंती लगत अनेक व्यावसायिकांनी थाटलेली दुकाने तसेच सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना परिसरातील छोट्या मोठ्या अनेक व्यवसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केलेली होती. तसेच काहींनी रस्त्याचा कडेला असलेल्या साइडगटार व साइडपट्यावर टाकलेल्या ब्लॉक वर देखील अतिक्रमणे केली होती त्यामुळे नेहमीच वर्दळीचा असणार्‍या या रस्त्यावरून कोल्हे कारखान्याचे कामगार, संजीवनी शैक्षणिक संस्थेचे विद्यार्थी-कर्मचारी, गोदावरी दूध संघाचे कर्मचारी, महिला महाविद्यालय, एस.एस.जी.एम महाविद्यालयाचे विद्यार्थी-कर्मचारी, जगभरातून साईबाबांच्या दर्शनासाठी येणारे साईभक्त शिर्डी ला जाण्यासाठी कोपरगाव रेल्वेस्टेशन येथे उतरून अनेक छोट्या मोठ्या वाहनांनी जात असतात त्या सोबतच वैजापूर व कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील अनेक छोट्या मोठ्या गावातील नागरिकांसाठी तालुक्याच्या गावी जाण्यासाठी हा एकमेव प्रमुख रस्ता असून या प्रमुख रस्त्यावर वाढत्या अनधिकृत अतिक्रमणामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होऊन अनकेदा छोटे मोठे अपघात होऊन अनेक वेळा वादविवादाचे प्रसंग निर्माण होत असे तर छोटे मोठे अपघात होऊन अनेकांना शारीरिक इजा झाल्या होत्या तर अनेकांच्या वाहनांचे देखील नुकसान होत होती. तर अनेकदा या रस्त्याने अत्यावश्यक सेवेतील अग्निशामक व रुग्णवाहिकेना येथून जातांना मोठा अडथळा निर्माण होत असे वारंवार प्रशासनाने सूचना देऊन देखील हे अतिक्रमण धारक आपले अतिक्रमण काढत न्हवते म्हणून सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय कोपरगाव च्या वतीने 25 फेब्रुवारी 2023 रोजी या रस्त्याचा मध्यापासून दोन्ही बाजूने 15 मीटर पर्यंत असलेल्या शासकीय जागेत अतिक्रमण केलेल्या सर्वांना नोटीस देत आपण आपली अतिक्रमणे नोटीस दिल्या पासून 15 दिवसाच्या आत काढून घ्यावी अन्यथा प्रशासनाच्या वतीने कोणतीही पूर्वसूचना न देता सर्व अतिक्रमणे काढून घेण्यात येईल व त्या साठी लागणारा सर्व खर्च आपल्या कडून वसूल करत आपणावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा लेखी इशारा दिला होता तरी देखील अनेक अतिक्रमण धारकांनी आपले अतिक्रमणे काढली नसल्याने अखेर बुधवार दि 17 मे रोजी कोपरगाव सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अधिकारी वर्षराज शिंदे यांच्या सह 15 अधिकारी व कर्मचार्‍यांच्या पथकाने दोन जेसीबी च्या साहायाने पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, उपपोलिस निरीक्षक भरत दाते, रोहिदास ठोंबरे यांच्या सह कोपरगाव, लोणी, शिर्डी,राहाता आदी पोलीस स्टेशनमधील सुमारे 40 महिला, पुरुष व होमगार्ड आदी पोलिस अधिकारी व  कर्मचार्‍यांच्या कडक बंदोबस्तात काढण्यात आले. या प्रसंगी मोलमजुरी करत आपला व आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत असणारी साधारणपणे 15 ते 20 कुटुंब या रस्त्याचा कडेला राहत होती भल्या सकाळीच अतिक्रमण पथकाने जेसीबी च्या साहाय्याने अतिक्रमण काढायची कारवाई सुरू केल्याने या ऐन कडाक्याच्या उन्हात या कुटूंबाचा डोक्यावरील छप्पर गेल्याने त्यांचा संसार उघड्यावर आल्याने अनेक महिला व पुरुषांना आश्रू अनावर झाले होते त्यांना पोटासाठी सकाळची चूल पेटविणे देखील शक्य नाही  झाल्याने नेहमीच सामाजिक कार्यात आग्रेसर असणार्‍या सुर्यतेज या संस्थेच्या वतीने सुशांत घोडकेव संदीप ठोके यांनी सर्व कुटूंबाना खिचडी भाताचे वाटप करत थोडासा का होईना त्या उघड्यावर आलेल्या कुटूंबातील लहान मोठ्यांचा पोटाला आधार दिला.
चौकट
पुन्हा अतिक्रमण नको  
प्रशासनाने पुन्हा या शासकीय जागेत अतिक्रमण होणार नाही याची खरबदारी घ्यावी तसेच रस्त्याचा कडेला दुतर्फा आसलेल्या शासकीय जागेवर काहीतरी सुशोभीकरण करत उत्तम असा पादचारी मार्ग तयार करावा.

COMMENTS