Homeताज्या बातम्या

 लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार 

 देवळाली प्रवरा : लग्नाचे आमिष दाखवून विवाहित तरुणाने १८ वर्षे ९ महिने वयाच्या तरुणीला घरातून घेऊन जात तिच्यावर अत्याचार केल्याची घटना मुळा धरण प

फक्राबाद दरोड्यातील आरोपी जेरबंद
शेवगाव तालुक्याच्या भगूर येथे मावा व सुगंधी तंबाखू विकणाऱ्यावर धाड
बालमटाकळी ते लाडजळगाव पालखी मार्गाचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून डांबरीकरण करा
तरुणीशी ओळख निर्माण केली, लग्नाचे आमिषही दाखवले अन् नंतर केला बलात्कार;  पुण्यात खळबळ | Navarashtra

 देवळाली प्रवरा : लग्नाचे आमिष दाखवून विवाहित तरुणाने १८ वर्षे ९ महिने वयाच्या तरुणीला घरातून घेऊन जात तिच्यावर अत्याचार केल्याची घटना मुळा धरण परिसरातील एका गावात १४ ते २४ जुलैदरम्यान घडली. याप्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात पांडू रामभाऊ पवार (रा. ढवळपुरी, ता. पारनेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची आरोपीसोबत ऑगस्ट २०२५मध्ये ओळख झाली होती. दोघांमध्ये दूरध्वनीवरून संवाद सुरू होता. आरोपीने तरुणीला लग्न करण्याचे आमिष दाखविले. दरम्यान, त्याचे यापूर्वीच लग्न झाले असल्याचे तरुणीला समजले. मात्र, पत्नीशी वाद असून ती माहेरी राहत असल्याचे आरोपीने सांगितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.१४ जुलै रोजी सकाळी आरोपी तरुणीच्या घरी गेला. दोघांनी घरातून निघून लग्न करू, असे सांगून त्याने तरुणीला मोटारसायकलवरून जांभळी गावाच्या शिवारातील त्याच्या घरी नेले. तेथे १४ ते २४ जुलैदरम्यान तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने केला आहे.दरम्यान, २४ जुलै रोजी आरोपीची पत्नी तेथे गेल्यानंतर तरुणीला आरोपीने पत्नीबाबत सांगितलेली माहिती खोटी असल्याचे समजले. त्यानंतर तिने आरोपीकडे लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने शिवीगाळ करून धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.घरी परतल्यानंतर तरुणीने आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर नातेवाइकांसह राहुरी पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघमारे करीत आहेत.

COMMENTS