माजलगाव: गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाचे औचित्य साधून सावली अर्बन संस्थेत आदर्श शिक्षिकांचा गौरव करण्यात आला. याचबरोबर संस्थेच्या ’सौभाग्यवती ठेव य

माजलगाव: गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाचे औचित्य साधून सावली अर्बन संस्थेत आदर्श शिक्षिकांचा गौरव करण्यात आला. याचबरोबर संस्थेच्या ’सौभाग्यवती ठेव योजना’ अंतर्गत सहभागी झालेल्या भाग्यवान महिला सभासदांना आकर्षक बक्षिसांचे वितरण उत्साहात पार पडले.
महिलांमध्ये बचत व गुंतवणुकीची सवय रुजावी या उद्देशाने वटपौर्णिमेच्या निमित्ताने सावली अर्बन संस्थेने ’सौभाग्यवती ठेव योजना’ सुरू केली होती. या योजनेत महिला सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या नावाने मुदतठेवी केल्या. योजनेत सहभागी होण्यासाठी महिला सभासद असणे आवश्यक होते. या योजनेतील विजेत्यांसाठी पहिले बक्षीस ५ ग्रॅम चांदीचे नाणे, फॅमिली लंच टिफिन आणि थर्मास बॉटल ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे, योजनेत सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेच्या पतीच्या नावाने विमा संरक्षणही संस्था उपलब्ध करून देणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी औदुंबर सादोळकर यांनी दिली.
बक्षीस वितरणात माजलगाव शाखेच्या सौ. सुभिद्राताई सोळंके यांनी प्रथम, आष्टी शाखेच्या सौ. प्रतिभा सुनील जोशी यांनी द्वितीय, तर शिरसदेवी शाखेच्या सौ. निलावती मनोहर काळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
गुरुपौर्णिमेनिमित्त माजलगाव शाखेत सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालयाच्या सहशिक्षिका सौ. अनुराधा लाहोरकर (खुर्पे) यांचा आदर्श शिक्षिका म्हणून सन्मान करण्यात आला. त्या ’आनंद’ या पुस्तकाच्या लेखिका असून साहित्य क्षेत्रात लेखिका, कवयित्री, कथाकार आणि प्रभावी निवेदिका म्हणून सक्रिय आहेत. त्यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारासह विविध संस्थांचे सुमारे २५ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच आष्टी शाखेत केंद्रीय प्राथमिक कन्या शाळेच्या सहशिक्षिका सौ. प्रतीक्षा जोशी यांचा आदर्श शिक्षिका म्हणून शाल, पुष्पगुच्छ व संस्थेची प्रतिमा देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी औदुंबर सादोळकर, शाखा व्यवस्थापक निर्वे, पासिंग अधिकारी जाधव, कर्ज विभाग प्रमुख साळवे, टेकाळे, जगताप, पिग्मी प्रतिनिधी सुधाकर सोळंके, आकांक्षा मॅडम, प्रगती मॅडम, डहाळे सर तसेच सभासद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS