Homeताज्या बातम्या

पंढरीच्या वारीत ‘के. जे. सोमैया’च्या स्वयंसेवकांचा उल्लेखनीय सहभाग; कोपरगाव महाविद्यालयात सन्मान

कोपरगाव: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे पुणे ते पंढरपूर आषाढी वारीनिमित्त आयोजित ‘स्वच्छ वारी – स्वस

मृग नक्षत्र कोरडे; बीड जिल्ह्यात शेतकरी हवालदिल! कापूस, सोयाबीन पिकांवर पावसाअभावी संकट
नवरदेवाच्या वडिलांवर लोखंडी रॉडने हल्ला; संगमनेर तालुक्यातील सतेचीवाडी येथील वरातीत धुमाकूळ
श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदी ढोरमले; जातेगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान

कोपरगाव: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे पुणे ते पंढरपूर आषाढी वारीनिमित्त आयोजित ‘स्वच्छ वारी – स्वस्थ वारी – निर्मल वारी – हरित वारी’ या राज्यस्तरीय उपक्रमात कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के. जे. सोमैया वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी उल्लेखनीय सहभाग नोंदविला.

दि. ९ ते २५ जुलै २०२६ या कालावधीत झालेल्या या उपक्रमात महाविद्यालयाचे स्वयंसेवक सौरव बाबासाहेब जाधव आणि सार्थक राजू दवंगे यांनी विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून पालखीसोहळ्यात सहभाग घेतला. राज्यस्तरीय ‘सक्षम महिला, समृद्ध महाराष्ट्र दिंडी’ अंतर्गत त्यांनी विद्यार्थी गटाचे नेतृत्व करत वारकऱ्यांची सेवा, आरोग्यविषयक मदत, मुक्कामाची व्यवस्था तसेच परिसर स्वच्छतेची महत्त्वाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

याशिवाय कडेपठार येथे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. पालखी सोहळ्यात अभंग, भक्तिगीते आणि भारूड सादरीकरणातून त्यांनी भक्तिमय वातावरण निर्माण केले.

या सामाजिक व वैचारिक उपक्रमातील उल्लेखनीय योगदानाबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, सचिव संजीव कुलकर्णी, विश्वस्त संदीपराव रोहमारे आणि प्राचार्य प्रा. (डॉ.) विजय ठाणगे यांच्या हस्ते सौरव जाधव व सार्थक दवंगे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. एस. गायकवाड, प्रा. (डॉ.) संजय दवंगे, रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे उपस्थित होते. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक डॉ. गणेश भामे, जिल्हा समन्वयक डॉ. गणेश निमसे, डॉ. सुनील मोहटे, डॉ. प्रताप फलफले, दिनेश जाधव, निलेश कडू आणि ऋषिकेश चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले.

COMMENTS