मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्याण न्यायालयाने समन्स बजावले असून, त्यांना येत्या ५ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदे

मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्याण न्यायालयाने समन्स बजावले असून, त्यांना येत्या ५ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे समन्स २००९ च्या लोकसभा निवडणुकीतील एका जुन्या आणि बहुचर्चित प्रकरणाशी संबंधित आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते वसंत डावखरे यांनी एका वादग्रस्त व्हिडिओप्रकरणी हा खटला दाखल केला होता. याच प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही समन्स बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या जुन्या प्रकरणातील न्यायालयाच्या आदेशामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

COMMENTS