Homeताज्या बातम्या

‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियानाचा शुभारंभ; अमली पदार्थांविरोधात व्यापक चळवळीची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: देशाला बाहेरून पराभूत करणे शक्य नसल्याचे शत्रूराष्ट्रांच्या लक्षात आल्याने आता भारतीय तरुणाईला अमली पदार्थांच्या जाळ्यात अडकवून देशाला आतू

मारहाणीच्या गुन्ह्यातील आरोपींची निर्दोष मुक्तता; श्रीगोंदा जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय
अमेरिकेच्या मध्य पूर्वेतील लष्करी तळांवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; अमेरिकन संरक्षण यंत्रणेने सर्व क्षेपणास्त्रे हवेतच केली नष्ट
रासायनिक खतांचा तुटवडा येऊ देऊ नका : आ. काळे 
ड्रग फ्री मुंबई' अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ; अमली  पदार्थांविरोधात सामूहिक लढ्याचे आवाहन – Maharashtra Crime Times

मुंबई: देशाला बाहेरून पराभूत करणे शक्य नसल्याचे शत्रूराष्ट्रांच्या लक्षात आल्याने आता भारतीय तरुणाईला अमली पदार्थांच्या जाळ्यात अडकवून देशाला आतून कमकुवत करण्याचा डाव रचला जात आहे. हा डाव उधळून लावण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येत अमली पदार्थांविरोधात व्यापक चळवळ उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबई येथे गुरुवारी आयोजित ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियानाच्या शुभारंभ सोहळ्यात दहा हजारांहून अधिक विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नागरिकांना संबोधित करताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपस्थितांनी ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ आणि व्यसनमुक्त भारत घडविण्याची सामूहिक शपथ घेतली.

मुख्यमंत्री म्हणाले की, भारत आज अवकाश संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करत असून जागतिक पातळीवर नवे स्थान निर्माण करत आहे. जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या भारताकडे असल्याने हीच देशाची सर्वात मोठी ताकद आहे. ही ऊर्जा योग्य दिशेने वापरली गेल्यास भारत जगातील अग्रेसर राष्ट्र म्हणून उभा राहील. म्हणूनच तरुणांना अमली पदार्थांच्या आहारी घालून देशाची भावी शक्ती खिळखिळी करण्याचा कट रचला जात आहे. या छुप्या युद्धात अमली पदार्थ हे सर्वात धोकादायक शस्त्र बनले असून केवळ पैशांच्या मोहापोटी काही समाजविघातक प्रवृत्ती त्याला हातभार लावत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

अमली पदार्थांचा संपूर्ण बंदोबस्त करण्यासाठी केवळ पोलिसांची कारवाई पुरेशी ठरणार नाही, असे स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी समाजकल्याण, आरोग्य, शालेय शिक्षण विभाग, पालक, शिक्षक आणि सामाजिक संस्थांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले. कृत्रिम अमली पदार्थांची (Synthetic Drugs) निर्मिती करणारी केंद्रे, पुरवठा साखळी, शैक्षणिक संस्थांच्या परिसरात कार्यरत विक्रेते तसेच त्यांच्या सूत्रधारांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. तरुणांनीच अमली पदार्थांना ठाम नकार दिला, तर त्यांची विक्री करणाऱ्यांचे धैर्य आपोआप संपेल, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी पुढील काही वर्षांत ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ आणि ‘ड्रग्ज फ्री महाराष्ट्र’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, तरुणाईची ऊर्जा योग्य मार्गाने वापरली गेली तर ती समाजाला नवे जीवन देऊ शकते. त्यामुळे विध्वंसाचे कारण न बनता समाजाला बळ देणारी शक्ती बनण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

दरम्यान, या कार्यक्रमास मंत्री मंगळप्रभाात लोढा, मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेंद्र भारती, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हाधिकारी आंचल गोयल तसेच विविध विभागांतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अखेरीस मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्यासमवेत छायाचित्रण करत अभियानाला उत्साहपूर्ण प्रारंभ दिला.

माहिती देणाऱ्यांची ओळख गुप्त राहणार

अमली पदार्थांच्या विरोधातील मोहिमेत नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः शाळा आणि महाविद्यालयांच्या प्रमुखांना पत्र पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. परिसरात अमली पदार्थांची विक्री किंवा व्यसनाकडे प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तींबाबत त्वरित माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले. अशी माहिती देणाऱ्या नागरिक, शिक्षक किंवा विद्यार्थ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल. तसेच उपयुक्त माहिती देणाऱ्यांचा शासनाकडून सन्मान करण्याचाही विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS