Homeताज्या बातम्यादेश

लिव्ह इनमध्ये राहणार्‍या प्रेयसीची हत्या

मृतदेहाचे तब्बल 35 तुकडे करून लावली विल्हेवाट

नवी दिल्ली : दिल्लीत एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील मालाड परिसरात लिव्ह इन मध्ये राहणार्‍या एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला दिल्ली ये

पुण्यात दगड डोक्यात घालून एकाचा खून
 शेतकऱ्यावर धारदार शस्त्राने वार करुन खून
राजधानीत आइसक्रीम विक्रेत्याची हत्या

नवी दिल्ली : दिल्लीत एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील मालाड परिसरात लिव्ह इन मध्ये राहणार्‍या एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला दिल्ली येथे नेत तीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने प्रेयसीच्या मृतदेहाचे तब्बल 35 तुकडे करुण ते फेकण्यासाठी तो रोज रात्री बाहेर पडायचा. हे हत्याकांड तब्बल पाच महिन्यांनी उघडकीस आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
आफताब अमीन पूनावाला असे आरोपीचे नाव आहे. तर श्रद्धा वाकर (वय 26) असे खून झालेल्या प्रेयसीचे नाव आहे. या प्रकरणी तीचे वडील विकास मदान वाकर (वय 59) यांनी दिल्ली येथी महरौली पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रद्धा वाकर ही मालाड येथील एका कॉल सेंटरमध्ये काम करत होती. या ठिकाणी श्रद्धाची ओळख ही आफताब अमीन पूनावाला यांच्या सोबत झाली. दोघे एकमेकांना आवडू लागले होते. यानंतर ते लिव-इन रिलेशनशिप मध्ये सोबत राहायला लागले होते. दारम्यान श्रद्धाने आफताबच्या मागे लग्न करण्याचा हट्ट धरला होता. त्याला तिच्याशी लग्न करायचे नव्हते. यामुळे तो तिच्या त्रासाला वैतागला होता. यामुळे आफताबने श्रद्धाला मारण्याच्या कट रचला. आपण दोघे दिल्ली येथे जाऊन लग्न करू अशी खोटी माहिती त्याने श्रद्धाला दिली. तिला मुंबईतून दिल्ली येथे नेले. मात्र, तो लग्न करत नसल्याने श्रद्धाने पुन्हा लग्न करण्यासाठी हट्ट केला. यामुळे वैतागलेल्या आफताबने तिला 18 मे रोजी गळा दाबून तिची हत्या केली. यानंतर तिच्या शरीराचे तब्बल 35 तुकडे केले. यानंतर दिल्लीतील विविध भागात रोज रात्री बाहेर पडून त्याने तिचे तुकडे फेकून दिले. तब्बल पाच महिन्यांपासून मुलीशी संपर्क न झाल्याने मुलीचे वडील विकास मदान वाकर यांनी 8 नोव्हेंबररला दिल्लीतील महरौली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी आफताब याचा माग काढत त्याला अटक केली. श्रद्धाचे वडील विकास वाकर हे मूळचे पालघर येथील आहेत. त्यांची मुलगी श्रद्धा वाकर ही मुंबईतील मालाड येथे एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये काम करत होती. ते लिव-इन रिलेशनमध्ये एकमेकांसोबत राहत होते. ही बाब घरच्यांना समजल्यावर त्यांनी त्यांचा नात्याला विरोध केला. श्रद्धाचे वडील विकास मदान वाकर यांनी सांगितले की, आम्ही विरोध केल्यावर मुलीने मुंबई सोडून दिले. यानंतर ती दिल्लीच्या महरौली परिसरातील छतरपुर या ठिकाणी राहत असल्याची माहिती मिळाली. ते विविध माध्यमातून मुलीची माहिती घेत होते. त्यांना श्रद्धाची फेसबुकवर अपलोड केलेल्या फोटोवरुन ती कुठे गेली याची देखील माहिती मिळत होती. श्रद्धा ही हिमाचल प्रदेश फिरायला गेली होती. यानंतर तिची काहीच माहिती मिळाली नाही. तिला त्यांनी फोन केला मात्र, तो लागत नव्हता. यामुळे त्यांची चिंता वाढली. त्यांनी 8 नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे जात छतरपूर येथे ती जय ठिकाणी राहत होती त्याठिकाणी चौकशी केली. मात्र, ते आढळले नाही. यानंतर त्यांनी महरौली पोलिस ठाण्यात मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. पोलिसानी टेक्निकल सर्विलांन्स करत आफताबला काल अटक केली. सध्या आफताबने दिलेल्या माहितीवरून श्रद्धाच्या मृतदेहांचे तुकडे शोधले जात आहेत.

COMMENTS