Homeताज्या बातम्या

ST प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC स्मार्ट कार्डसाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटी प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी. शासनाच्या विविध प्रवासी सवलतींचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या NCMC स्मार्ट कार्डच्या अंमलबजावणी

अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई; मालवाहू वाहनांचे परवाने रद्द करण्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश
डिझेल दरवाढीचा एसटीला फटका; ‘लालपरी’च्या भाडेवाढीचे संकेतइंधन खर्चामुळे महामंडळावर वार्षिक 124 कोटींचा अतिरिक्त भार
१ ऑगस्टपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड बंधनकारक; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

एसटी प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी. शासनाच्या विविध प्रवासी सवलतींचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या NCMC स्मार्ट कार्डच्या अंमलबजावणीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.यापूर्वी १ ऑगस्टपासून हे स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात येणार होते. मात्र, अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप कार्ड मिळाले नसल्याने त्यांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुदतवाढ जाहीर केली आहे.राज्य शासनाकडून अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, तसेच ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के भाडे सवलत दिली जाते. या सवलती अधिक पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने देण्यासाठी NCMC स्मार्ट कार्डची अंमलबजावणी करण्यात येत आहे.मात्र, राज्यभरात अनेक पात्र प्रवाशांनी नोंदणी करूनही त्यांना अद्याप स्मार्ट कार्ड मिळालेले नाही. तसेच अनेक बसस्थानकांवर आणि डेपोमध्ये स्मार्ट कार्ड काढण्यासाठी मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे.काही ठिकाणी स्मार्ट कार्ड जादा दराने विकले जात असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सरकारने आणखी एका महिन्याची मुदतवाढ दिली आहे.दरम्यान, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि इतर पात्र प्रवाशांनी १ सप्टेंबरपूर्वी NCMC स्मार्ट कार्डची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.

COMMENTS