Homeताज्या बातम्या

उघड्या गटारीत दुचाकीस्वार कोसळलाअकोले-संगमनेर मार्गावर दुर्घटना ; धोकादायक ठिकाणाबाबत नागरिकांत संताप

अकोले : अकोले-संगमनेर मार्गावरील महालक्ष्मी कॉलनीसमोरील रस्त्यालगत असलेल्या उघड्या जम्बो गटारीत दुचाकीस्वार कोसळल्याची घटना सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे संबंधिताला दोरीच्या साहाय्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या अपघातात कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.तुकाराम भिमाजी साबळे (रा. आंभोळ, भवारवाडी) हे दुचाकीवरून संगमनेरहून अकोलेकडे येत असताना सेंट्रल बँकेसमोरील उघड्या गटारीजवळ त्यांची दुचाकी घसरली. यामुळे ते सुमारे सात ते आठ फूट खोल गटारीत पडले. गटारीत टाकण्यात आलेल्या मोठ्या पाइपवर पडल्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.या ठिकाणी यापूर्वीही अशा प्रकारचे अपघात घडले असून, गटारीत वाहन कोसळण्याची ही चौथी घटना असल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. गटारीभोवती संरक्षक कठडे उभारावेत, अशी मागणी स्थानिक व्यापारी, नागरिक तसेच नगरसेविका शितल अमोल वैद्य यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार केली होती. मात्र, गेल्या चार वर्षांत त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.वारंवार अपघात होऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एखाद्याचा बळी गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवालही स्थानिकांनी उपस्थित केला आहे. सध्या नागरिकांमध्ये सदर घटनेबाबत अन प्रशासनाच्या दुर्लक्षतेबाबत नाराजगी असल्याचे बोलले जात आहे.ना पाईप, ना सीडी वर्कअलीकडेच राजूर-अकोले-संगमनेर मार्गाचे रुंदीकरण करण्यात आले. मात्र, या कामाच्या अंदाजपत्रकात संबंधित ठिकाणी आवश्यक सीडी वर्कचा समावेश करण्यात आला नव्हता. नागरिकांच्या पाठपुराव्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराला सीडी वर्क उभारण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले होते. तसेच यासाठी आरसीसी पाइप उपलब्ध करण्यात आल्याचा उल्लेखही विभागाने १६ नोव्हेंबर २०२२ रोजी नगरसेविका शितल वैद्य यांना पाठविलेल्या पत्रात केला होता. प्रत्यक्षात मात्र आजपर्यंत ना पाइप बसविण्यात आले, ना सीडी वर्कचे काम पूर्ण झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

अकोलेत युरियाचा ३३५ टन बफर साठा उपलब्धग्राहक पंचायतच्या पाठपुराव्याला यश; ५१ कृषी सेवा केंद्रांवर वितरण सुरू
तुकाराम मुंढेंची बदली रद्द करा; अकोले दिव्यांग क्रांती संघटनेची मागणी
सहा कृषी सेवा केंद्रांचा परवाना निलंबित

COMMENTS