Homeताज्या बातम्या

आमदार आनंदराव बोंढारकर यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड दक्षिण मतदारसंघात विविध सेवा उपक्रमांचे आयोजन

नांदेड: नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या १ ऑगस्ट रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघात विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषय

दाक्षिणात्य अभिनेता धनुष थलपती विजय यांच्या पावलावर पाऊल ठेवणार? राजकारणातील प्रवेशाबाबत जोरदार चर्चा!
अहंकाराचा त्याग करून विठ्ठलभक्तीत लीन व्हा : हभप चेडे; शेवगाव येथील दध्नेश्वर शिवालयात विशेष हरिकीर्तन महोत्सव संपन्न
श्रीगोंदा तालुका मुख्याध्यापक संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा राजमाता जिजाऊ पतसंस्थेकडून सत्कार

नांदेड: नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या १ ऑगस्ट रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघात विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. केवळ वाढदिवस साजरा करण्याऐवजी समाजोपयोगी कार्यातून जनतेशी नाळ जोडण्याचा संदेश या उपक्रमांतून दिला जाणार आहे.

पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देत मतदारसंघात पाच हजारांहून अधिक वृक्षांची लागवड व संवर्धनाचा संकल्प करण्यात आला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय पाटील गिरडे, युवासेना जिल्हाप्रमुख पै. बाळू पाटील मोरे (ब्राह्मणवाडेकर), साहेबराव मामीडवार, नरेंद्र गायकवाड, तुलजेश यादव, कामाजी पाटील, गीताताई पुरोहित, साईनाथ पाटील बावणीकर आणि भीमराव गायकवाड यांच्या पुढाकारातून विविध भागांत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. ‘एक घर, एक झाड’ या उपक्रमालाही विशेष प्रतिसाद मिळत आहे.

विद्यार्थ्यांसाठी वही, पेन, शालेय साहित्य आणि गणवेश वाटपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.

आरोग्य सेवेलाही प्राधान्य देत तुप्पा येथे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असून, सोनखेड येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप केले जाणार आहे. तसेच विविध धार्मिक स्थळांवर महाआरती, महाप्रसाद, अन्नदान, कीर्तन, प्रवचन आणि स्नेहभोजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आमदार बोंढारकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमांमुळे मतदारसंघात सामाजिक बांधिलकीचा संदेश पोहोचत असून, कार्यकर्ते आणि नागरिक यामध्ये उत्साहाने सहभागी होत आहेत.

COMMENTS