Homeताज्या बातम्या

नांदेड शासकीय कृषी महाविद्यालयाला मोठा दिलासा; गट ’अ’ आणि ’ब’ मधील ३२ पदांना मंजुरी!

नांदेड: नांदेड येथील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या प्रशासकीय व शैक्षणिक बळकटीकरणाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. महाविद्यालयातील आस्थ

ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयातून दिलासा नाही; सहा खासदारांच्या विलिनीकरणावर स्थगती देण्यास नकार
पालघर, वसई-विरारमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार; नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, साचलेल्या पाण्यात कार घुसून अपघात
मुक्त पत्रकारितेच्या शिरपेचात मानाचा सातवा तुरा

नांदेड: नांदेड येथील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या प्रशासकीय व शैक्षणिक बळकटीकरणाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. महाविद्यालयातील आस्थापनेवरील गट ‘अ’ आणि गट ‘ब’ संवर्गातील तब्बल ३२ पदांना महाराष्ट्र शासनाने अधिकृत मान्यता प्रदान केली आहे. आमदार बालाजी कल्याणकर यांनी राज्य शासनाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे यश मिळाले आहे.

महाराष्ट्र शासनाने सन २०२३ मध्ये नांदेड शासकीय कृषी महाविद्यालायाला मंजुरी दिली होती. त्यानंतर शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून महाविद्यालयात प्रत्यक्षात प्रवेश प्रक्रिया सुरू होऊन अध्यापनाचे कामकाज पूर्ण क्षमतेने चालवले जात आहे. मात्र, महाविद्यालयाचा वाढता विस्तार लक्षात घेता शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाज अधिक सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक पदभरतीची नितांत गरज होती.

एकूण ९६ मंजूर पदांपैकी पहिल्या टप्प्यात गट ‘अ’ आणि गट ‘ब’ संवर्गातील ३२ पदांना मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक दर्जाला आणि प्रशासनाला मोठी गती मिळणार आहे. शिल्लक राहिलेल्या उर्वरित पदांनाही लवकरात लवकर मंजुरी मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असून, त्यालाही लवकरच यश लाभेल, असा विश्वास आमदार बालाजी कल्याणकर यांनी व्यक्त केला.

शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करत शासकीय कृषी महाविद्यालय, नांदेडचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. जायेवार तसेच सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी आमदार बालाजी कल्याणकर यांचे विशेष आभार मानले आहेत.

COMMENTS