Homeताज्या बातम्या

जमीन वादातून धमक्यांना वैतागून शेतकऱ्याची आत्महत्या; मोबाईल व्हिडिओमुळे भांडाफोड, दोघांवर गुन्हा दाखल

जामखेड : शेतजमीन बळकावण्याचा प्रयत्न आणि शेतातील विजेच्या पोलवरून सतत मिळणाऱ्या धमक्यांमुळे त्रस्त होऊन जामखेड तालुक्यातील दरडवाडी येथील विकास सा

नांदेड जिल्ह्यात अवैध रेती उपसा व वाहतुकीवर मोठी कारवाई; 57.25 लाखांचा मुद्देमाल जप्त
गेवराईत बनावट ‘सिंधी’ गुत्त्यावर छापा; 4.71 लाखांचा मुद्देमाल जप्त
माजी खा. विनायक राऊतांच्या सुनेचे छळाचे गंभीर आरोपगुन्हा दाखल ; सर्व आरोप निराधार असल्याचे राऊतांचे स्पष्टीकरण
शेतीपूरक व्यवसायातून थांबतील शेतकरी आत्महत्या । Farmer Suicide

जामखेड : शेतजमीन बळकावण्याचा प्रयत्न आणि शेतातील विजेच्या पोलवरून सतत मिळणाऱ्या धमक्यांमुळे त्रस्त होऊन जामखेड तालुक्यातील दरडवाडी येथील विकास साहेबराव रणसिंग (वय ४०) या शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओच्या आधारे दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. २६ जुलै) सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास दरडवाडी येथील विकास रणसिंग यांनी राहत्या घरातील लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेतला. ही बाब त्यांची बहीण सुवर्णा पोडमल व पत्नी विद्या रणसिंग यांच्या निदर्शनास आली. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने खर्डा येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले, परंतु डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, जामखेड येथे आणण्यात आला.

यावेळी पत्नी विद्या रणसिंग यांनी मयत विकास यांचा मोबाईल तपासला असता, गॅलरीमध्ये आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेले काही व्हिडिओ आढळून आले. मयत विकास रणसिंग यांनी आत्महत्येपूर्वी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये दोन व्यक्तींवर थेट आरोप केले आहेत.

महादेव गोवर्धन दराडे (रा. दरडवाडी) हा त्यांची ६ गुंठे जमीन बळकावत होता आणि ती परत देत नव्हता. तसेच महादेव दराडे याने विकास रणसिंग यांच्या डोक्यात बाटली मारून भांडणही केले होते. शेतावरून बांधावरून इलेक्ट्रिक मोटार वायर नेण्यावरून वाद सुरू होता. या दोघांकडून सतत धमक्या मिळत असल्याने वैतागून आपण आत्महत्या करत असल्याचे विकास रणसिंग यांनी व्हिडिओमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे.

सदर घटनेचा गुन्हा दाखल करण्यासाठी मयत विकास रणसिंग यांचा मृतदेह खर्डा पोलीस स्टेशन येथे आणण्यात आला. यावेळी मातंग समाजाचा मोठा जमाव पोलीस ठाण्यात एकत्र आला. त्यामुळे काही काळ वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनले होते.

उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांनी तातडीने खर्डा पोलीस ठाण्याला भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. त्यांनी नातेवाईकांची समजूत काढत मयताची पत्नी विद्या विकास रणसिंग यांच्या फिर्यादीवरून महादेव गोवर्धन दराडे (रा. दरडवाडी) व चतुर्भुज दाताळ (रा. बाळगव्हाण) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत व पोलीस उपनिरीक्षक अशोक खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा पोलीस स्टेशनचे पथक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

COMMENTS