नांदेड: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी (दि. २५)

नांदेड: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी (दि. २५) शहरात विजय मार्च काढण्यात आला. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आलेल्या या मार्चमध्ये काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
खासदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या विजय मार्चला महाराष्ट्र काँग्रेसच्या सहप्रभारी रेहना चिश्ती, प्रदेश सचिव डॉ. स्मिता शहापूरकर, जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे आणि महानगराध्यक्ष अब्दुल गफ्फार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना खासदार रवींद्र चव्हाण यांनी, “देशातील लाखो विद्यार्थी-युवकांच्या संघर्षामुळे, अनेकांच्या बलिदानामुळे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सातत्यपूर्ण आंदोलनामुळे केंद्र सरकारला झुकावे लागले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा लोकशाहीचा विजय असून विद्यार्थी शक्तीच्या संघर्षाचे हे यश आहे,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
या विजय मार्चमध्ये माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, प्रा. यशपाल भिंगे, सुरेश गायकवाड, सुरेंद्र घोडसकर, डॉ. श्रावण रँपनवाड, डॉ. दिनेश निखाते, नगरसेवक मुन्ना अब्बास, सत्यपाल सावंत, शेख पाशा, अनिल मोरे, गोविंद बाबा गोंड, अजिज कुरेशी, प्रताप देशमुख बारडकर, संजय वाघमारे, सुरेश हाटकर, गणेश ढगे, कुमार कुर्तडीकर, महेश देशमुख तरोडेकर, डॉ. भगवान मनुरकर, दीपकसिंग हुजारीया, बापूसाहेब पाटील, रमेश चित्ते, अब्दुल रहीम, डॉ. बाकी, शंकर शिंदे, आंबादास रातोळे, गणेश कोकाटे, नागराज सुलगेकर, गगन यादव, सुरजीतसिंग तबेलेवाले, नईम शेख, जेशिका शिंदे, सुरज शिंदे, अक्षय नगळे, संदीप देशमुख तरोडेकर, संदीपकुमार देशमुख, गोविंद पाटील, सोनू पाटील, विष्णू पावडे, विलास पावडे, सत्यजित बिराजदार, प्रथमेश पावडे, प्रकाश दिपके, अझहर शेख, कलिम शेख यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS