Homeताज्या बातम्या

सापडलेली ३.३० लाखांची बॅग प्रामाणिकपणे परत; श्री रेणुका देवी संस्थानच्या कर्मचार्‍यांचा आदर्श

माहूर: श्री रेणुका देवी संस्थानच्या कर्मचार्‍यांनी प्रामाणिकपणाचा नवा आदर्श घालून देत सापडलेली बॅग, त्यातील ३ लाख ३० हजारांची रोकड तसेच इतर सर्व

पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त २६ जुलै रोजी ’ताल साधना म्युझिक सर्कल’चा भव्य पुरस्कार सोहळा
रस्ता मंजूर, निधी मंजूर; काम कधी सुरू होणार? प्रा. सनी वाघमारे यांचा प्रशासनाला संतप्त सवाल
शेतकर्‍यांनी रोखला महामार्ग; अंबाजोगाई-लातूर वाहतूक विस्कळीत; हजारो शेतकर्‍यांच्या आंदोलनाने प्रशासनाचे वेधले लक्ष
Student wins hearts after returning bag with ₹3 lakh | News Karnataka

माहूर: श्री रेणुका देवी संस्थानच्या कर्मचार्‍यांनी प्रामाणिकपणाचा नवा आदर्श घालून देत सापडलेली बॅग, त्यातील ३ लाख ३० हजारांची रोकड तसेच इतर सर्व मौल्यवान वस्तू संबंधित भाविकाकडे सुरक्षितपणे सुपूर्द केल्या. या घटनेमुळे संस्थानच्या कर्मचार्‍यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सदर बॅगची योग्य ती शहानिशा करून ती सुरेश भाऊसिंग ताटू (रा. आडगाव, जि. नाशिक) यांच्याकडे स्वाधीन करण्यात आली. यावेळी संस्थानचे व्यवस्थापक विजय राऊत, लेखापाल योगेश साबळे, सुरक्षा अधिकारी माधव मुंडे, सुरक्षारक्षक प्रफुल केंद्रे, सुंदरसिंग पवार, किरण बालपांडे तसेच पोलीस कर्मचारी गजानन जाधव आणि कैलास सर्जे उपस्थित होते.

याप्रसंगी संस्थानचे विश्वस्त चंद्रकांतजी भोपी आणि संजय कान्नाव यांनी कर्मचार्‍यांच्या प्रामाणिकपणाचे विशेष कौतुक करत त्यांच्या कर्तव्यनिष्ठेची प्रशंसा केली. या घटनेमुळे श्री रेणुका देवी संस्थानची विश्वासार्हता आणि सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, नागरिकांकडून व भाविकांकडून संबंधित कर्मचार्‍यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या प्रामाणिक कृतीमुळे समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.

COMMENTS