Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

युवकांनी इंटरनेटच्या गराड्यात अडकून न राहता एक तास मैदानावर घालवावा – राहुल मोरे

बीड प्रतिनिधी - आरोग्य हीच खरी संपत्ती असून आपण आपल्या येणार्‍या पिढी ला व्यायामाचे महत्त्व वेळीच पटवून देऊन आपला वेळ मोबाईल मध्ये न घालवता तो मु

तरुणाचा मृतदेह रस्त्यात आढळला
शरद पवारांच्या प्रकृती बद्दल UPDATE | सुपरफास्ट २४ | Marathi News | LokNews24
गुजरातेत सत्ता विक्रमाच्या बरोबरीची संधी ! 

बीड प्रतिनिधी – आरोग्य हीच खरी संपत्ती असून आपण आपल्या येणार्‍या पिढी ला व्यायामाचे महत्त्व वेळीच पटवून देऊन आपला वेळ मोबाईल मध्ये न घालवता तो मुलांसोबत क्रीडांगणावर खेळून आपले,आपल्या कुटुंबाचे आरोग्य जपावे असे आवाहन राहुल मोरे यांनी जागतिक आरोग्य दिनानिमित्त केले आहे.
मोबाईल,इंटरनेट, टीव्ही ,संगणक, सोशल मीडिया, कडे वाढत चाललेला कल आज आपले आरोग्य धोक्यात घालत असून वाढत चाललेला ’स्क्रीन टाइमिंग’ चिंतेची बाब आहे. तासनतास मोबाईलवर बोटे फिरणारे लोक आणि सोशल मीडियावर रममान झालेला युवा वर्गाने वेळीच गांभीर्य ओळखून आपल्या भविष्यासाठी ,आपल्या निरामय जीवनासाठी एक तास तरी मैदानी खेळाला देऊन आपले आरोग्य सांभाळणे काळाची गरज असून व्यायामाबरोबरच पौष्टिक आहाराकडे ही लक्ष देणे गरजेचे आहे.तरच आरोग्याबरोबर शारीरिक ,मानसिक वाढ उत्तम होऊन आपले जीवन ,आनंदमय, सुखमय, आरोग्यमय ठणठणीत राहील हे नक्की च. कोण किती व्यायाम करतो ह्यापेक्षा किती नियमित करतो हे महत्त्वाचे ठरते, म्हणून आपल्या आरोग्याची काळजी आपण योग्य वेळी घेत या धावपळीच्या जीवनशैलीत आपल्या शरीराकडे व आहाराकडे लक्ष देऊन आपले जीवन ऊर्जावान बनवावे. नियमित व्यायामाने आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच शारीरिक आरोग्य सुधारून जीवन निरोगी राहते. निरोगी व्यक्ती,निरोगी कुटुंब ,निरोगी जीवन जगण्यासाठी आरोग्य उत्तम असल्या शिवाय दुसरा पर्यायच नाही हे नक्की. शारीरिक आरोग्य बरोबरच मानसिक आरोग्य सर्वप्रथम सुदृढ असणे महत्वाचे असते म्हणून निरोगी आरोग्य जगण्यासाठी मानसिक आरोग्यही चांगले असणे खूप महत्त्वाचे आहे. मानसिक आरोग्यच आपल्या सर्वांगीण आरोग्याचा पाया आहे, हे विसरू चालणार नाही. मानसिक आरोग्य निरोगी राहण्यासाठी योग आणि ध्यानधारणा करणे हे उत्तम पर्याय असुन या शिवाय चांगल्या व तुमच्या आवडत्या कामांसाठी वेळ काढून सहभाग घेऊन आपले जीवन आनंदमय जगणे महत्त्वाचे आहे.असे ही आवाहन केले आहे.

COMMENTS