Homeताज्या बातम्या

कोणतीही ग्रूमिंग अकादमी नाही, गुगल-इंटरनेटवरून केली तयारी; ओडिशाच्या प्रसुची पांडाने पटकावला ‘मिस टीन युनिव्हर्स इंडिया २०२६’चा किताब!

भुवनेश्वर: आजच्या काळात पूर्वीपेक्षा अधिक सुविधा उपलब्ध असल्या तरी या सुविधांचा फायदा सर्वांनाच घेता येतो असं नाही. यश हे केवळ साधनसामग्रीवर अवलं

अकोलेत विद्यार्थ्यांना आरोग्य जागृती अभियानांतर्गत मार्गदर्शन; पौगंडावस्था, मुखआरोग्य आणि व्यसनमुक्तीवर व्याख्यान
भिवंडीतील भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू; कारने तीन दुचाकींना उडवले
नाट्यशास्त्राच्या डिप्लोमा व प्रमाणपत्र परीक्षेत अभिषेक इनकर व अभिषेक घुले प्रथम; के.एस.के. महाविद्यालयाचे यश
Miss Teen Universe India 2026 is @pprasuciii__ 👸🏻🩷🇮🇳 National  Director: @iamnikhilanand Stage Design: @iam_nishantanand Production:  @kgproductions.in Styling: @iam_vaibhavraj Clicked by: @vjsuraj.jpegg Show  Director: @shamkhan.official Backstage ...

भुवनेश्वर: आजच्या काळात पूर्वीपेक्षा अधिक सुविधा उपलब्ध असल्या तरी या सुविधांचा फायदा सर्वांनाच घेता येतो असं नाही. यश हे केवळ साधनसामग्रीवर अवलंबून नसून जिद्द, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मिळवता येतं, हेच ओडिशात राहणाऱ्या प्रसुची पांडा हिने सिद्ध करून दाखवलं आहे. प्रसुचीने ‘मिस टीन युनिव्हर्स इंडिया २०२६’ चा किताब जिंकत आपल्या कुटुंबासह संपूर्ण राज्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले आहे.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, या स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी प्रसुचीकडे कोणताही राष्ट्रीय स्तरावरील किताब नव्हता, तसेच तिने कोणत्याही मोठ्या ‘ग्रूमिंग अकादमी’कडून प्रशिक्षणही घेतलेले नव्हते. तरीही तिने आपल्या मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले. ‘मिस टीन युनिव्हर्स इंडिया २०२६’ किताबावर नाव कोरल्यानंतर प्रसुची भुवनेश्वर येथे पोहोचली असता तिचे मोठ्या थाटात स्वागत करण्यात आले. शहरातील एका भव्य हॉटेलमध्ये तिच्या अभिनंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, जिथे तिच्या समर्थकांनी मोठी गर्दी करत तिला शुभेच्छा दिल्या.

गुगल आणि इंटरनेटच्या माध्यमातून केली तयारी

प्रसुचीची आई राणी पांडा म्हणाल्या, “हा प्रवास आमच्या कुटुंबासाठी अत्यंत नवीन आणि आव्हानात्मक होता. जेव्हा प्रसुचीने या क्षेत्रात जाण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा आम्हाला याबद्दल काहीच माहिती नव्हती. इतर स्पर्धकांकडे अनुभवी ट्रेनर आणि संपूर्ण टीम होती; परंतु प्रसुचीने सर्व तयारी स्वतःच केली. इंटरनेट आणि गुगलच्या मदतीने तिने रॅम्प वॉक, ग्रूमिंग आणि स्पर्धेशी संबंधित सर्व गोष्टी शिकून घेतल्या. आज आमच्या लेकीमुळे लोक आम्हाला ओळखत आहेत, याचा अभिमान आहे.”

एप्रिलपासून तयारी; आता आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करणार

प्रसुची पांडा सध्या ११ वी इयत्तेत शिकत असून तिने एप्रिल २०२६ पासून या स्पर्धेची तयारी सुरू केली होती. या काळात तिने विशेषतः आपल्या ‘रॅम्प वॉक’ आणि संवाद कौशल्यांवर कठोर मेहनत घेतली. प्रसुची म्हणाली, “ही माझी पहिलीच राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा होती आणि पहिल्याच प्रयत्नात यश मिळणे ही माझ्यासाठी खूप खास गोष्ट आहे.” आता ती पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण ओडिशामधून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS