Homeताज्या बातम्या

अर्धापूर येथे अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल

अर्धापूर: लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी शारीरिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात उघडकीस आ

उच्च न्यायालयाच्या आदेशालाही हरताळ? केंद्रप्रमुख पदोन्नती प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी
लावणी कलाकारांना शासनाने अनुदान द्यावे; लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची राज्य सरकारकडे मागणी
नेकनूरमधील दर्गा कॉलनीसह विविध वसाहतींच्या मूलभूत सुविधांसाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
Nashik Crime | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अर्धापूर: लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी शारीरिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पोक्सो (POCSO) कायद्यान्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीचे वय १९ वर्षे असून ती बारावीत शिक्षण घेत आहे. आरोपी अंसाजी दशरथ शिंदे (रा. पाटनुर, ता. अर्धापूर) याचे मूळ नातेवाईक पीडितेच्या गावात राहत असल्याने त्याचे गावात सतत येणे-जाणे होते. यादरम्यान दोघांमध्ये ओळख वाढून प्रेमसंबंध निर्माण झाले होते. आरोपीने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. ९ मे २०२५ रोजी पीडितेचे कुटुंबीय लग्नानिमित्त बाहेर गेले असताना आरोपीने घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केला. त्यानंतरही लग्नाचे आमिष दाखवत त्याने वेळोवेळी तिच्यावर अत्याचार चालू ठेवला.

सुमारे एक महिन्यापूर्वी या प्रकरणाची माहिती पीडितेच्या कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांनी विवाहाचा प्रस्ताव ठेवला. त्यानुसार १५ जून २०२६ रोजी आरोपीने आपली आई व काही ओळखीच्या लोकांना पीडितेच्या घरी आणले. मात्र लग्नाचा विषय निघताच आरोपी अंसाजी शिंदे याने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला आणि धमकी देत तेथून निघून गेला.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेच्या जबाबावरून अर्धापूर पोलीस ठाण्यात आरोपी अंसाजी दशरथ शिंदे याच्यावर बीएनएस कलम ६४ (१), ६४ (२) (एम), ६९ आणि पोक्सो कायद्याच्या कलम ४, ६, १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश भोसले हे करत आहेत.

COMMENTS