Homeमहाराष्ट्र

संजीवनी इंजिनिअरिंगच्या ९१७ विद्यार्थ्यांना देश-परदेशात नोकरी; जपानमधील कंपनीकडून ३२ लाखांचे हायेस्ट पॅकेज

कोपरगाव: संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये विक्रमी कामगिरी करत ९१७ विद्यार्थ्यांना

जि.प. व पं.स. निवडणुकांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे – अशोक बुटले; अर्धापुरात जंगी स्वागत
पावसाची ओढ; मागच्या वर्षी जूनमध्ये ९० टक्के पेरण्या; यंदा अजून चाड्यावर मूठ नाही!
हिंदू खाटीक समाजासाठी कर्ज व अनुदान योजनांसाठी अर्ज मागविले; नांदेड जिल्हा कार्यालयाचे आवाहन
Sanjivani College of Engineering: Courses, Fees, Admission 2025,  Placements, Ranking

कोपरगाव: संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये विक्रमी कामगिरी करत ९१७ विद्यार्थ्यांना देश-विदेशातील नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. विशेष म्हणजे, जपानमधील ‘एसएमसी’ कंपनीने एका विद्यार्थ्याची तब्बल वार्षिक ३२ लाख रुपयांच्या पॅकेजवर निवड केली असून, ही महाविद्यालयाच्या प्लेसमेंट इतिहासातील अत्यंत उल्लेखनीय उपलब्धी ठरली आहे.

याशिवाय क्रेडने ३० लाख रुपये, टॉपी इंडस्ट्रीज (जपान)ने २५ लाख रुपये, डायकिन एअर टेक्नॉलॉजी (जपान)ने २२ लाख रुपये, आयसीन (जपान)ने २० लाख रुपये, ओपन अप कन्स्ट्रक्शन (जपान)ने १७ लाख रुपये, अवलाराने १४.५० लाख रुपये आणि जस्पे कंपनीने ११ लाख रुपयांचे वार्षिक वेतन देऊन विद्यार्थ्यांची निवड केली आहे.

महाविद्यालयात आयोजित कॅम्पस प्लेसमेंट प्रक्रियेत २०० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये टीसीएस, जॉन्सन कंट्रोल्स इंटरनॅशनल पीएलसी, विसेन इन्फोटेक, फिलिप्स ग्लोबल बिझनेस सर्व्हिसेस, वेस्को डिजिटल इनोव्हेशन सेंटर, बॉश लिमिटेड, गोदरेज इन्फोटेक, महिंद्रा अँड महिंद्रा, फॉरेसिया आणि फॉर्विस माझार्स यांसारख्या बलाढ्य कंपन्यांचा समावेश होता.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कॉम्प्युटर अभियांत्रिकीचे ११९, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे १०५, मेकॅनिकल अभियांत्रिकीचे १५४, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर अभियांत्रिकीचे ८५, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीचे ९१, सिव्हिल अभियांत्रिकीचे ७९, मेकॅट्रॉनिक्स अभियांत्रिकीचे ९०, स्ट्रक्चरल अभियांत्रिकीचे ५८ आणि एमबीए विभागातील १३६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

महाविद्यालयाला २०१९ मध्ये स्वायत्त (ऑटोनॉमस) दर्जा मिळाल्यानंतर उद्योगाभिमुख अभ्यासक्रम, कौशल्याधारित प्रशिक्षण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर विशेष भर देण्यात आला आहे. त्याचा परिणाम म्हणून दरवर्षी प्लेसमेंटची संख्या आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या वार्षिक वेतन पॅकेजमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे संस्थेने सांगितले.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या पालकांचे अभिनंदन करताना संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितीन कोल्हे आणि व्यवस्थापकीय विश्वस्त अमित कोल्हे यांनी प्रशिक्षण व प्लेसमेंट विभाग, संचालक डॉ. आर. ए. कापगते आणि सर्व विभागप्रमुखांचे विशेष कौतुक केले.

COMMENTS