Homeताज्या बातम्या

बालदिंडीने वांबोरी स्टेशन परिसर भक्तिमय; जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम उत्साहात संपन्न

अहिल्यानगर: आषाढी वारीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वांबोरी स्टेशन येथे बालदिंडी व ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध सं

हबीबिया कॉलनीतील ’कल्याण क्लोज’वर पोलिसांचा धडक छापा; १.०४ लाखांचा मुद्देमाल जप्त, ८ जणांवर गुन्हा
घुले प्रकरण: घटनेदिवशी मी अन् गाडीही घरीच! सौरभ सोनवणेंनी आरोप फेटाळले, कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी
ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर अधिवेशनात लक्षवेधी मांडावी; खासदार-आमदारांना डॉ. हंसराज वैद्य यांचे आवाहन

अहिल्यानगर: आषाढी वारीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वांबोरी स्टेशन येथे बालदिंडी व ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या मनमोहक वेशभूषेत सहभागी होत वारकरी परंपरेचा सुरेख परिचय करून दिला.

दिंडीत विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताई आणि जनाबाई यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांचा विशेष सहभाग होता. टाळ-मृदंगाच्या गजरात काढण्यात आलेल्या या दिंडीत ग्रंथदिंडीसह ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथा आदी धार्मिक ग्रंथांचे पूजन करण्यात आले. सुंदर सजविलेली बैलगाडी हे या दिंडीचे मुख्य आकर्षण ठरली.

बालदिंडीचे श्री साई मंदिर परिसरात ग्रामस्थांकडून उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी भजनी मंडळाने विविध अभंग व हरिनामाचा गजर केला. कार्यक्रमानंतर उपस्थित विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

या उपक्रमासाठी प्रसाद शेळके, संपत कल्हापुरे, जयश्री कल्हापुरे, शामराव खेसम्हाळस्कर, हरिश्चंद्र कल्हापुरे, काकासाहेब खळेकर, मनोज शेंडकर, राहुल हरिश्चंद्रे, बाळासाहेब हरिश्चंद्रे, सचिन हरिश्चंद्रे, भागवतराव लोखंडे, कारभारी खळेकर, ज्ञानेश्वर कुसमूडे, कृष्णा कुसमूडे, रोहीदास नन्नवरे, गोरक्षनाथ कल्हापुरे, शांता हंडाळ, लता दळवी, सिताबाई खेसम्हाळस्कर, रूपाली खळेकर, विजय कल्हापुरे, जालिंदर जाधव, एकनाथ कल्हापुरे आणि अमोल गाडे आदींनी सहकार्य केले.

पुढील वर्षीच्या बालदिंडीच्या संपूर्ण भोजन व्यवस्थेची जबाबदारी राहुल हरिश्चंद्रे व जालिंदर जाधव यांनी स्वीकारली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी खडांबे गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, मुख्याध्यापिका उषा पवार, चारूशीला रायकर, कानिफनाथ बनकर, राहुल लोंढे तसेच शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले. सडे केंद्राचे केंद्रप्रमुख रविंद्र बोरुडे आणि राहुरीच्या गटशिक्षणाधिकारी जयश्री कार्ले यांनी या सुंदर उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

COMMENTS