Homeताज्या बातम्या

40 कोटींच्या निधीचा विनियोग पाणीपुरवठा व स्वच्छतेला प्राधान्याने करा-डॉ. सारिका क्षीरसागर

बीड नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि. 23) पार पडली. या सभेत 15 व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत 40 कोटीच्या निधीचा विनियोग तसेच शहरातील विव

कल्यामध्ये स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रमाचा शुभारंभमहा रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
नेवासेत कचऱ्याचा प्रश्न गंभीर; तीव्र आंदोलनानंतरही नगरपंचायत प्रशासनाची निष्क्रियता कायम, नागरिकांमध्ये संताप
अरुंद गल्ल्यांतील कचरा समस्येवर डॉ. कैलाश यादव यांचा आवाजलहान हातरिक्षांद्वारे कचरा संकलनाची मागणी



बीड नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि. 23) पार पडली. या सभेत 15 व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत 40 कोटीच्या निधीचा विनियोग तसेच शहरातील विविध प्रलंबित नागरी प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या निधीचा प्राधान्याने पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया, पाणी पुनर्वापर आणि जलसंधारणासाठी वापर करण्यात यावा. तसेच निधी खर्चाचे नियोजन करण्यापूर्वी विशेष सभा बोलावावी, अशी मागणी भाजपच्या गटनेत्या डॉ.सारिकाताई योगेश क्षीरसागर यांनी केली.
डॉ.क्षीरसागर म्हणाल्या की, 2023 ते 2026 या कालावधीत बीड नगरपरिषदेत लोकनियुक्त प्रतिनिधी नसल्याने अनेक आर्थिक निर्णय प्रलंबित राहिले. परिणामी महावितरणकडे व्याजासह सुमारे 52 कोटी रुपयांची वीज थकबाकी झाली आहे. मूळ थकबाकीची रक्कम निश्चित करून आवश्यक मंजुरीनंतर वित्त आयोगाच्या निधीतून वीज बिलाचा भरणा केल्यास शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. याशिवाय पिंपळगाव व काडीवडगाव पाणीपुरवठा योजनांसाठी अतिरिक्त वीजभार मंजूर करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी त्यांनी केली. भविष्यातील जलसुरक्षेसाठी बिंदुसरा व करपरा नदीतील सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारणे, सर्व इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंगची अंमलबजावणी करणे आणि भूजल पुनर्भरणाची कामे हाती घेण्याची सूचनाही त्यांनी केली. घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी शहरात कायमस्वरूपी जागा संपादित करून एमआरएफ, कंपोस्ट व बायोगॅस प्रकल्प उभारावेत. तसेच नवीन घंटागाड्या व आवश्यक यंत्रसामग्रीची खरेदी करावी, अशीही त्यांनी मागणी केली. यावर भूमिका मांडताना उपनगराध्यक्ष विनोद मुळूक यांनी सांगितले की, वीज बिलावरील व्याजमाफीसंदर्भात विधिमंडळात बैठक झाली असून त्याचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. तोपर्यंत नगरपरिषद प्रतीक्षा करेल. मात्र, वित्त आयोगाच्या निधीतून पाणीपुरवठ्याशी संबंधित तातडीची कामे हाती घेत प्रत्येक प्रभागाला समान निधी दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.  सर्वसाधारण सभा सुरूच होती.
विशेष सभा घेण्याचे आश्वासन
15 व्या वित्त आयोगाचा निधी केवळ खर्च करण्यासाठी नव्हे, तर शहराच्या स्वच्छता व पर्यावरण व्यवस्थेला दीर्घकालीन बळकटी देण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने वापरला जावा, असा आग्रह डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी सभेत धरला. त्यांच्या विशेष सभा घेण्याच्या मागणीला नगरपरिषद प्रशासन व पदाधिकार्‍यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच यासंदर्भात स्वतंत्र विशेष सभा आयोजित करण्याचे आश्वासन दिले.
सत्ताधार्‍यांमधील खडाजंगी ठरली चर्चेचा विषय
पाणी पुरवठ्याशी संबंधित कामासाठी तुकडे पाडून प्रभागनिहाय निधी देण्याचा निर्णय उपनगराध्यक्ष तथा पाणी पुरवठा सभापती विनोद मुळूक यांनी घेतला. मात्र त्याला स्वच्छता सभापती निजाम शेख यांनी विरोध केला. असा निर्णय न घेता सर्व कामे एकत्रित करावेत असे म्हटले. त्यानंतर स्थायी समिती सदस्य अमर नाईकवाडे यांनी शेख यांना जोरदार विरोध केला. हा निर्णय मतदान घेऊन केला जावा, इथपर्यंत पोहोचला होता. मात्र, मुळूक यांच्या निर्णयाला तिन्ही पक्षाच्या गटनेत्यांनी दिलेला पाठिंबा पाहता नगराध्यक्षानी हस्तक्षेप केला आणि मतदानाचा प्रसंग टळला. सत्ताधार्‍यांमध्येच झालेली खडाजंगी हा चर्चेचा विषय ठरली होती.

COMMENTS