Homeताज्या बातम्या

कड्यात संविधान प्रेमी व सामाजिक संघटनेच्या वतीने शांततापूर्ण निषेध रॅली! केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

कडा: सोनम वांगचुक व अभिजित दीपके यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्

२६ जून रोजी वीरशैव लिंगायत समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबीर; शिंगणापूर येथील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये १०० हून अधिक रुग्णांची तपासणी
‘एफ’ ग्रेड कायम असलेल्या ७ महाविद्यालयांतील पीजी प्रवेश स्थगित; २२ महाविद्यालयांना मोठा दिलासा

कडा: सोनम वांगचुक व अभिजित दीपके यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ कडा शहरात बुधवारी संविधान प्रेमी व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने शांततापूर्ण निषेध रॅली काढण्यात आली.

आष्टी तालुक्यातील कडा येथे काढण्यात आलेल्या या शांततापूर्ण निषेध रॅलीची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून झाली. त्यानंतर बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, ग्रामपंचायत मुख्य रस्ता मार्गे जाऊन रॅलीचा समारोप पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात करण्यात आला.

लोकशाही, संविधान आणि विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांच्या संरक्षणासाठी आयोजित करण्यात आलेल्या या शांततापूर्ण निषेध रॅलीत संविधान प्रेमी नागरिक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

COMMENTS