Homeताज्या बातम्या

पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व वृक्षारोपण; ४७ युवकांचे रक्तदान

बीड: राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष इर्शाद भैया शेख यांच्य

डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्याला यश; बीडच्या विकासकामांना मिळणार गती
देवाभाऊ सावधान! “मनीषाताई आपल्याला संपवत आहेत”
धनंजय मुंडे-पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 500 विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप पुण्यात शानूर भाई शेख यांच्या पुढाकारातून शिक्षणाला प्रोत्साहन; मान्यवरांची उपस्थिती

बीड: राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष इर्शाद भैया शेख यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमात ४७ हून अधिक युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ४७ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष शंकरजी देशमुख, बीड नगरपरिषदेच्या भाजपच्या उमेदवार घुमरे ताई, नवनाथ शिराळे, सतीश पाटील, संध्याताई राजपूत, भाजप नेते बिलालभाई, मीराताई गांधले, शैलाताई मुसळे, समीर बेग, कपिल सौदा, शाहबाज कादरी, रियाज सिद्दिकी यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून रक्तदानाचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाचा सकारात्मक संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आला. उपस्थितांनी अशा सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

COMMENTS