Homeताज्या बातम्या

डॉ. सुनीता पारे यांना ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्कार; अहिल्यानगर येथे भव्य समारंभात सन्मान

कोपरगाव: महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ संलग्न अहिल्यानगर जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रदान करण्यात ये

राज्य पत्रकार संघटनेची कोपरगाव शहर कार्यकारिणी जाहीर 
युवतीसोबत गैरवर्तन; तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, संशयित मुलगा ताब्यात
लोकनेते मारुतराव घुले पाटील हे परमार्थ प्रेमी आदर्श राजकारणीहभप ज्ञानेश्वर कदम ; पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन सोहळ्याचे आयोजन

कोपरगाव: महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ संलग्न अहिल्यानगर जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार’ सोमैया विद्यामंदिर, साकरवाडीच्या मुख्याध्यापिका डॉ. सुनीता पारे यांना प्रदान करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान त्यांना अहिल्यानगर येथे आयोजित जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण समारंभात प्रदान करण्यात आला.

प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ (नांदेड) तसेच लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. सर्जेराव निमसे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. पारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या प्रसंगी शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर, मुख्याध्यापक, शिक्षक व गणित अध्यापक मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. सुनीता पारे यांनी मुख्याध्यापिका म्हणून विद्यार्थीकेंद्री शिक्षण, शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी, नावीन्यपूर्ण उपक्रम, शिक्षक-पालक समन्वय, मूल्याधिष्ठित शिक्षण आणि शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली सोमैया विद्यामंदिरने शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक आणि सहशालेय उपक्रमांमध्ये उल्लेखनीय प्रगती साधत परिसरात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष समीर सोमैया, सचिव सुहास गोडगे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व पालकांनी डॉ. पारे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS