Homeताज्या बातम्या

बारामतीत अजितदादांच्या पुतळ्याचे लोकार्पण; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते अनावरण

बारामती: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांच्या पूर्णाकृती ब्रॉन्झ पुतळ्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार

परळी वैजनाथ बस स्थानक परिसर चिखलमय; आषाढी एकादशीच्या काळात प्रवासी व भाविक हैराण
मिनी बस दरीत कोसळून दोन पर्यटकांचा मृत्यू; राजगड परिसरातील पाबे घाटातील भीषण अपघात
श्रीगोंद्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश! दिल्लीतील आंदोलनाला पाठिंब्यासाठी शहरातून भव्य शांतता रॅली

बारामती: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांच्या पूर्णाकृती ब्रॉन्झ पुतळ्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते नटराज नाट्य कला मंडळ, तिरंगा सर्कल येथे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी पुतळ्यास पुष्प अर्पण करून भावपूर्ण अभिवादन केले.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, नगराध्यक्ष सचिन सातव, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार स्वप्नील रावडे, गटविकास अधिकारी किशोर माने, मुख्याधिकारी पंकज भुसे, माजी ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, पवार कुटुंबीय तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

लोकार्पण कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांच्या हस्ते दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जीवनावर आधारित विशेष छायाचित्र दालनाचे लोकार्पण करण्यात आले. त्यांनी या दालनाला भेट देऊन छायाचित्रांची पाहणी केली. कार्यक्रमादरम्यान पोलीस बँड पथकाच्या वतीने पुतळ्यास मानवंदना देण्यात आली. तसेच दिवंगत अजित पवार यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी सर्वधर्मीय प्रार्थना घेण्यात आली आणि निलिमा नृत्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गीत वंदना सादर केली.

COMMENTS