Homeताज्या बातम्या

श्री बंकटस्वामी महाविद्यालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

बीड: येथील श्री बंकटस्वामी महाविद्यालयात बुधवार, २२ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अभ

संत गोरोबा काकांच्या ७५९ व्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये भव्य शोभायात्रा; गुणवंतांचा होणार गौरव
शेतकर्‍यांना कृषी विभागाचे आवाहनकडधान्य प्रक्रिया केंद्रासाठी अर्ज सादर करावेत
तीन वर्षांनंतर चोरीची ६८ हजारांची रोकड परत; शिवाजीनगर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

बीड: येथील श्री बंकटस्वामी महाविद्यालयात बुधवार, २२ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर धांडे, उपप्राचार्य डॉ. शंकर शिवशेट्टे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. ब्रम्हनाथ मेंगडे तसेच पर्यवेक्षक प्रा. हनुमंत सोट यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अजितदादा पवार यांच्या राज्याच्या विकासासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या नेतृत्वगुणांचे स्मरण केले. विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आदरांजली अर्पण केली.

या कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. मनोजकुमार नवसे, डॉ. प्रकाश कोंका, प्रा. राजाभाऊ नागरगोजे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम शांततापूर्ण व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

COMMENTS