परळी वै.: नवगण शिक्षण संस्था, राजुरी संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, परळी वैजनाथ येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार या

परळी वै.: नवगण शिक्षण संस्था, राजुरी संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, परळी वैजनाथ येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनपर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आबासाहेब हांगे होते. यावेळी महाविद्यारातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मा. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्राचार्य डॉ. आबासाहेब हांगे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, मा. अजितदादा पवार हे विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जातात. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजहिताची भावना जोपासावी आणि राष्ट्रनिर्मितीत आपले योगदान द्यावे.
याप्रसंगी उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मा. अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. बबन झांजे यांनी मानले.

COMMENTS