बेलापूर: विशेष मतदारयादी पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत बेलापूर ग्रामपंचायत व बूथस्तरीय अधिकाऱ्यांतर्फे आयोजित दोन दिवशीय शिबिराचा सुमारे अडीच हजार मतदा

बेलापूर: विशेष मतदारयादी पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत बेलापूर ग्रामपंचायत व बूथस्तरीय अधिकाऱ्यांतर्फे आयोजित दोन दिवशीय शिबिराचा सुमारे अडीच हजार मतदारांनी लाभ घेतला. दरम्यान, या शिबिरास तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी भेट देऊन एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष शरद नवले व बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवसांत बेलापूर – ऐनतपूर गावातील सुमारे अडीच हजार मतदारांच्या माहितीची पडताळणी व नवीन नोंदणीचे काम पूर्ण करण्यात आले.
या शिबिराची तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. एकाच छताखाली सुविधा मिळाल्याने पडताळणीचे काम अत्यंत सुलभ झाले असून मतदारांची मोठी सोय झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी शरद नवले, अभिषेक खंडागळे, मीना साळवी, चंद्रकांत नवले, अरविंद साळवी, मुस्ताक शेख, पुरुषोत्तम भराटे, प्रफुल्ल डावरे, हाजी इस्माईल शेख, विशाल आंबेकर, गोपी दाणी, महेश कुऱ्हे, पोलीस पाटील अशोक प्रधान, भाऊसाहेब तेलोरे, राज गुडे, सोमनाथ जावरे, शफिक बागवान, सचिन वाघ, समीर जहागीरदार, शहनवाज सय्यद, सचिन अमोलिक, दिलीप अमोलिक, बाबुराव पवार, मोहसीन सय्यद, दादासाहेब कुताळ, ग्रामपंचायत अधिकारी निलेश लहारे, तसेच बूथस्तरीय अधिकारी लता परदेशी, नितीन जाधव, अमोल साळवे, संजय वाघ, रईसअहमद मोहम्मद, स्वाती वारुळे, अंजली आढाव, मनीषा शिंदे, गणेश कातोरे, नितीन धनवडे, अखिल अहमद अब्दुल अजीज, हाजी जुलेखाबेगम अकबर, मुकुंद कारले, अबुबकर अब्दुल मजीद, विकास बनकर, सहाय्यक संगीता राशिनकर, अल्मास सय्यद, शितल तेलोरे, श्रुतिका लोंढे, स्वाती बारगळ, स्वाती कुऱ्हे, तैसिन शेख, मोसिना सय्यद, अलका भडके, कुंदा नवले, तानजीला शेख, जयश्री घाणे, जयश्री जाधव यांसह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS