Homeताज्या बातम्या

वाळकीमध्ये वाळूची चोरटी वाहतूक करणारा टेम्पो पकडला

विनापरवाना बेकायदेशीररित्या वाळूचे उत्खनन करून तिची विक्री करण्याच्या उद्देशाने चोरटी वाहतूक करणारा टेम्पो वाळूसह एमआयडीसी पोलिसांनी पकडला. या कारवाई

तब्बल 110 वर्षांनी झाली संस्थेची घटना अंतिम
ग्रामपंचायतींचा धुराळा जोरात, दोन हजार जागांसाठी चौपट उमेदवार
जिल्ह्यातील रुग्णांच्या वेदना मुक्तीसाठी आ.संग्राम जगताप यांचा पुढाकार

विनापरवाना बेकायदेशीररित्या वाळूचे उत्खनन करून तिची विक्री करण्याच्या उद्देशाने चोरटी वाहतूक करणारा टेम्पो वाळूसह एमआयडीसी पोलिसांनी पकडला. या कारवाईत आठ लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई नगर-मनमाड रोडवरील हॉटेल साई रामजवळ केली. याबाबतची माहिती अशी की मनमाड रोडवर वाळूची चोरटी वाहतूक करणारा टेम्पो जाणार असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांनी मिळाली. त्यावरून एमआयडीसी पोलिसांनी शिवारातील हॉटेल साईराम जवळ जवळून जाणारा टेम्पो (क्रमांक एमएच-17 टी 4579) त्यातील वाळूसह जप्त करुन टेम्पो चालक लक्ष्मण चव्हाण (वय 26, राहणार तालुका राहुरी) याला ताब्यात घेतले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी पोलिस नाईक धनंजय करांडे यांच्या फिर्यादीवरून चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस नाईक राहुल शिंदे करीत आहे.

COMMENTS