Homeताज्या बातम्या

सौ. के. एस. के. महाविद्यालयात ‘पाऊस गाणी’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांच्या बहारदार सादरीकरणाने सभागृह दुमदुमले

बीड: सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात संगीत विभागाच्या वतीने आयोजित 'पाऊस गाणी' या बहारदार संगीत क

सज्जन-दुर्जन असा भेद न करता माऊलींनी सर्वांवर कृपा केली; ह.भ.प. श्री राम महाराज काजळे यांचे प्रतिपादन
राडी येथे खेती बचाव अभियानाचा शुभारंभ; शेतकर्‍यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन
महिला कला महाविद्यालयात मा. अशोकरावजी पाटील (दादा) यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

बीड: सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात संगीत विभागाच्या वतीने आयोजित ‘पाऊस गाणी’ या बहारदार संगीत कार्यक्रमाचे उद्घाटन २० जुलै २०२६ रोजी नवगण शिक्षण संस्थेच्या सहसचिव डॉ. दीपाताई क्षीरसागर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. पावसाळ्याचे स्वागत करणे आणि विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देणे, या दुहेरी उद्देशाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमप्रसंगी विद्यार्थी सिद्धार्थ राजेश केदार याने ‘पाऊस पहिला’, यशवंत भीमराव घोडेराव याने ‘मन उधाण वाऱ्याचे’, कु. आकांक्षा बडे हिने ‘दिस चार झाले मन’, कु. वैष्णवी काळे हिने ‘अधीर झाले मन’, कु. ऋतुजा मोगरे हिने ‘ताल से ताल मिला’, धनंजय दराडे याने ‘राधा ही बावरी’, कु. अश्विनी कोकाटे हिने ‘रिमझिम गिरे सावन’, सिद्धेश्वरी कोकाटे हिने ‘रुपेरी वाळूच्या माडाच्या बनात’ आणि कैवल्या सुरवसे याने ‘मोहब्बत बरसा देना तू’ ही गाणी सादर केली. जुन्या व नव्या सदाबहार मराठी-हिंदी पावसाळी गाण्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मन जिंकून घेतली.

संगीत विभागाच्या प्राध्यापक डॉ. प्रियंका देशमाने यांनी ‘घन घन माला नभी दाटल्या’ हे गीत सादर करून कार्यक्रमात शास्त्रीय संगीताचा रंग भरला. या कार्यक्रमास नवगण शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. सुधाकर गुट्टे, डॉ. विश्वंभर देशमाने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ. अनिता शिंदे, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. खान ए. एस., कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य डॉ. नारायण काकडे आणि पर्यवेक्षक प्रा. जालिंदर कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगीत विभाग प्रमुख डॉ. महेश दाडगे, डॉ. राहुल सोनवणे, प्रा. सुरेश थोरात, डॉ. प्रियंका देशमाने, प्रा. इंद्रजित भांगे व पवन शिंदे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ. राहुल सोनवणे यांनी केले. या सोहळ्याला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS